25.8 C
Ratnagiri
Monday, September 16, 2024
HomeKhedखेड येथे मडगाव वांद्रे एक्सप्रेस व जनशताब्दी एक्सप्रेसला थांबा मिळण्यासाठी निवेदन

खेड येथे मडगाव वांद्रे एक्सप्रेस व जनशताब्दी एक्सप्रेसला थांबा मिळण्यासाठी निवेदन

खेड येथे सदर ट्रेनला थांबा नसल्याने नागरिकांची गैरसोय होत आहे.

शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हाप्रमुख व दापोली विधानसभा मतदार संघाचे माजी आमदार संजयराव कदम यांच्या नेतृत्वाखाली रेल्वे स्टेशन खेड येथे मडगाव वांद्रे एक्सप्रेस व मुंबई मडगाव जनशताब्दी एक्सप्रेस सदर ट्रेनला खेड येथे थांबा मिळण्यासाठी तसेच विविध मागण्यांसाठी रेल्वे प्रशासनाला निवेदन देण्यात आले. खेड हे जिल्ह्याचे मध्यवर्ती ठिकाण आहे. दापोली मंडणगड खेड येथील लोक खेड रेल्वे स्टेशनचा वापर करतात त्याचबरोबर लोटे एमआयडीसी येथील प्रवासी व दापोली येथील पर्यटक देखील खेड रेल्वे स्टेशनचा वापर करतात मात्र खेड येथे सदर ट्रेनला थांबा नसल्याने नागरिकांची गैरसोय होत आहे. तसेच इतर विविध समस्यांबाबत निवेदन देण्यात आले. तसेच थांबा न मिळाल्यास उग्र आंदोलन करण्याचा इशारा दापोली मतदार संघाचे महाआमदार संजयराव कदम यांनी रेल्वे प्रशासनाला दिला.

या वेळी शिवसेना उपतालुकाप्रमुख सईद, भाई तिसेकर, खेड पंचायत समिती माजी सदस्य प्रकाश मोरे, शहरप्रमुख दर्शन महाजन, माजी नगराध्यक्ष अरविंद शेठ तोडकरी या नगरसेवक राजु संसारे, शिवसेना विभाग प्रमुख दत्ता भिलारे, शिवसेना विभाग प्रम ख अंकुश कदम, उप विभाग प्रमुख प्रदीप सकपाळ, देवसडे ग्रामपंचायत माजी सरपंच सुभाष उर्फ नाना सावंत, कर्टेल ग्रामपंचायत माजी सरपंच श्रीधर चव्हाण, बशीर भाई हमदुले, तिसे शाखा प्रमुख राजु मोहाने, तिसे ग्रामपंचायत सदस्य दिलीप मोहाने, भडगाव शांखा प्रमुखप्रमुख शदानिश सागर मोगरे, आंबये शाखा प्रमुख मंगेश सकपाळ, मंदार शिर्के, मिलिंद सकपाळ तसेच सर्व आजी माजी पदाधिकारी कार्यकर्ते ग्रामस्थ प्रवासी मोठ्या संख्येने उपस्थितीत होते.

RELATED ARTICLES

Most Popular