26.8 C
Ratnagiri
Friday, July 4, 2025

विजयदुर्ग’ वर पूल बांधून दोन जिल्हे जोडा…

तालुक्यातील कुंभवडे व सिंधुदुर्गच्या देवगड तालुक्यातील पाळेकरवाडी...

दाभोळ बंदराचा विकास करा – आ. शेखर निकम

दाभोळ ते पेढे हा जलमार्ग क्र. २८...

मोकाट गुरांचा दिवसाचा खर्च १० हजार – पालिकेला भुर्दंड

शहरातील मोकाट गुरांना पकडण्याची मोहीम पालिकेने हाती...
HomeRajapurराजापुरात 'जनशताब्दी एक्सप्रेस' ला थांबा द्या…

राजापुरात ‘जनशताब्दी एक्सप्रेस’ ला थांबा द्या…

ही कोकण रेल्वे राजापूर तालुक्यातून जात असून, सोल्ये येथे कोकण रेल्वेचा तालुक्यातील थांबा आहे.

कोकण रेल्वेमार्गावरील तालुक्यातील सोल्ये येथील राजापूर स्थानकात मडगाव- जनशताब्दी एक्स्प्रेसला थांबा देण्यात यावा, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस अजित यशवंतराव यांनी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्याकडे केली आहे. रेल्वे राज्यमंत्री दानवे यांची प्रत्यक्ष भेट घेऊन यशवंतराव यांनी हे निवेदन दिले. या वेळी त्यांच्यासमवेत आमदार शेखर निकम उपस्थित होते. कोकण रेल्वेच्या माध्यमातून राजापूरसह रत्नागिरी जिल्हा देशातील विविध भागांसह जगभरामध्ये जोडला गेला आहे. ही कोकण रेल्वे राजापूर तालुक्यातून जात असून, सोल्ये येथे कोकण रेल्वेचा तालुक्यातील थांबा आहे. या व्यतिरिक्त सौंदळ येथेही काही रेल्वेगाड्यांना थांबा आहे. या दोन्ही ठिकाणी प्रवाशांकडून कोकण रेल्वेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून, त्यामध्ये दिवसागणिक प्रवाशांमध्ये वाढच होत चालली आहे.

मडगाव-जनशताब्दी या सुपरफास्ट एक्स्प्रेस गाडीला कोकण रेल्वेमार्गावर थांबा मिळावा, अशी मागणी मुंबईतून ये-जा करणाऱ्या प्रवाशांकडून अनेक वर्षापासून मागणी केली जात आहे. त्या मागणीची दखल घेऊन या गाडीला कोकण रेल्वेमार्गावर थांबा देण्यात आला असला तरी तो मोजक्या ठिकाणी थांबा दिला आहे. त्यामुळे अनेक प्रवाशांना या गाडीने प्रवास करणे शक्य होणार नाही. ही बाब लक्षात घेऊन राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस यशवंतराव यांनी मडगाव-जनशताब्दी या सुपरफास्ट एक्स्प्रेसला तालुक्यातील सोल्ये येथील रेल्वे थांब्यावर मडगाव- जनशताब्दी सुपरफास्ट एक्स्प्रेसला थांबा मिळावा, अशी मागणी केली आहे. त्याबाबतचे निवेदन त्यांनी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री दानवे यांची दिल्ली येथे प्रत्यक्ष भेट घेऊन दिली.

RELATED ARTICLES

Most Popular