रत्नागिरीच्या शासकीय तंत्रविद्यालयात शिकणाऱ्या एका विद्यार्थ्यांची सोशल मिडीयावर पुण्यातील मुलीसोबत मैत्री झाली. या विद्याथ्यनि प्रेमाचा प्रस्ताव ठेवला मात्र दोघांचे धागेदोर काही जमले नाहीत. बहुधा मुलीच्या आईवडिलांनी व अन्य घराच्या लोकांनी विरोध केला. प्रेम जमताजम ताच फिसकटले. यामुळे कॉलेज कुमाराच्या संतापाचा पारा चढला. त्याने मोबाईलवरून दमदाटी केली. पुणेकरांच्या सांगण्यावरून असभ्य भाषेत संवाद साधत त्याने तिच्यासह तिच्या आईवडिलांना शिवीगाळही केली. तेथूनच या कॉलेज कुमाराला धडा शिकविण्याचा प्लॅन या पुणेकरांनी केला. यातूनच हे सर्व थरारनाट्य घडले.
गोड बोलून बोलावले – पुणेकर तरूणानी आधी फोनवरून कॉलेज कुमारीशी संपर्क साधला. तुमचं खरोखरच एकमेकांवर प्रेम असेल तर आपण ते जमवून देऊया. झाले गेले वाद बाजूला ठेवूया. आम्ही तुला भेटायला येतो. प्रत्यक्ष बोलून घेवूया, असे त्यांनी सांगितले. या कॉलेज कुम ाराला भेटण्यासाठी पुण्याहून कार करून ४ ते ५ जण रत्नागिरीत नववर्षाच्या पहिल्याच दिवशी म्हणजे गुरूवार दि. १ जानेवारीच्या दुपारी दाखल झाले. या दरम्यानं गुगल सर्चवरून ते तरूणाचे मोबाईल लोकेशन सर्च करत होते. दुपारी १२ च्या सुमारास ते रत्नागिरीतील मारुती मंदिर सर्कल येथे येऊन पोहचले.
समोर येताच मारहाण – कॉलेज कुमाराशी गोड शब्दात संपर्क साधण्यात आला. तोदेखील त्याला भुलला. आपले जुळतेय या आनंदात होता. फोरवरच भेटीची जागा ठरली. ठरल्याप्रमाणे पुणेकर मंडळी तेथे येऊन एका कारमध्ये थांबली होती. काहीवेळाचत कॉलेजकुमारही तेथे पोहोचला. त्याच्यासोबत आणखी एक तरुण होता. बहुदा त्याचा मित्र असवा. ते कारपर्यंत येऊन पोहचताच कारमधील तरूण धडाधड खाली उतरले. एका तरुणाच्या हातात मोबाईल होता. त्याच मोबाईलचे लोकेशन पुणेकर सर्च करीत होते. हातात मोबाईल असलेला तरुण हाच, असे लक्षात येताच त्यांनी त्याला बेदम मारहाण सुरू केली.
हजारो लोक जमले – अस काही घडणार आहे. याची किंचितही कल्पना नसलेल्या मोबाईल हातात घेऊन आलेल्या तरुणाने जोरात आरडाओरड सुरू केली. बरोबरचा दुसरा तरुणही लोकांना मदतीसाठी बोलावू लागला. नेमका हा काय प्रकार आहे, हे बघण्यासाठी आजूबाजूचे लोक तेथे धावले. बघता बघता हजारोंची गर्दी तेथे जमली. मार खाणारा तरुण जीवाच्या आकांताने ओरडत होता. मात्र मारहाण करणारे शिवीगाळ करत त्याला मारतच सुटले होते. हे लोक आपल्याला का मारहाण करत आहेत हेही तरुणाला कळत नव्हते.
रत्नागिरीकरांनी दाखवला खाक्या – अखेर जमावातील १० ते १५ लोकांनी पुढाकार घेत हा नेमका काय प्रकार आहे? याची माहिती घेण्याचा प्रयत्न केला. मात्र मारहाण करणारे कोणाला काही सांगण्याच्या मनस्थितीत नव्हते. अखेर पुढाकार घेणाऱ्यांनी त्यांना रोखले. आधी चार प्रेमाचे शब्द सांगितले. ते ऐकत नाहीत मग रत्नागिरीकरांनीही आपला खाक्या दाखविला. मारहाण होत असलेल्या तरूणाला बाजूला केले. यावेळी त्यांनी दिलेल्या माहितीवरून सोशल मिडीयावरच्या प्रेमाची भानगड समोर आली. अखेर रत्नागिरीकरांनी पुणेकरांना आवरून परतले. परतवले कसले पळवूनच लावले अशी चर्चा त्यानंतर सुरू होती.
प्रेमवीर नेमका दुसराच ? – दरम्यानं मार खाणारा तरूण या प्रकरणातला प्रेमवीर नव्हताच अशी माहिती आता पुढे आली आहे. त्याच्यासोबत असलेला दुसरा तरूण त्याला घेऊन आला होता. पुणेकरांशी बोलण्यासाठी त्याने आपला फोन मित्राला दिला होता. पुणेकर केवळ तो मोबाईल फोन ट्रेस करत होते. त्याच दरम्यानं तो तरुण समोर आला आणि ज्याच्या हातात मोबाईल होता त्यानेच फुकटचा मार खाल्ला अशीही चर्चा परिसरात सुरू होती.
पोलिस येताच पसार – हे सर्व घडत असताना या ठिकाणी पोलिसही दाखल झाले. मात्र पोलिस गाडी पाहताच पुण्याहून आलेले तरूण आपल्या गाडीत बसून क्षणार्धात पसार झाले. यामुळे या प्रकरणात पुढे कोणतीही कायदेशीर कारवाई झाल्याची माहिती उपलब्ध नाही.
सोशल मिडियावर चर्चा – मारुती मंदिरसारख्या सदैव गजबजलेल्या परिसरात दिवसाढवळ्या झालेल्या या राड्याची गुरुवारी दिवसभर रत्नागिरी शहरात चर्चा सुरू होती. सोशल मिडियावर पोस्ट करत. धुमशान सुरू होते..

