26 C
Ratnagiri
Sunday, August 31, 2025

कोत्रेवाडीतील कचरा प्रकल्पाला विरोध कायम, उपोषणकर्त्यांकडे प्रशासनाचे दुर्लक्ष

कोत्रेवाडी येथील प्रस्तावित डंपिंग ग्राऊंड हटावसाठी ग्रामस्थांनी...

आरवली-संगमेश्वर ते बावनदी येथील खड्डे जैसे थे

राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनी आरवली-संगमेश्वर ते बावनदी...

मुंबई-गोवा महामार्गासाठी ना. योगेश कदम यांचे गणपतीबाप्पाला साकडे

पुढच्या वर्षी महामार्ग पूर्ण होईल असे दरवर्षी...
HomeRatnagiriअसाही एक कोरोना योद्धा

असाही एक कोरोना योद्धा

कोरोनाच्या धर्तीवर माणुसकी हरवलेली अनेक उदाहरण आपण रोज ऐकतो, पाहतो. कोरोनाच्या भीतीमुळे एखाद्या कुटुंबातील सदस्याचा जरी मृत्यू झाला तर त्यांचे अंत्यसंस्कार करायला नकार देतात. त्यामध्ये काही जन सामाजिक बांधिलकी म्हणून अशा वेळी धावून येतात. अनेक लॉक कोरोना महामारी सुरु झाल्यापासून अविरत मेहनत घेऊन निस्वार्थ सेवा बजावताना दिसत आहेत.  

अशाच एका मर्चंट नेव्ही ऑफिसर बद्दल जाणून घेणार आहोत. चिपळूण मध्ये वास्तव्याला असणारे अस्लम मालगुंडकर या अधिकार्याने स्वत:च्या जीवाची पर्वा न करता, कोरोना रुग्णांच्या सेवेकरीता स्वतःला वाहून घेतले आहे. सुट्टीसाठी घरी आले असताना कोरोनाच्या महामारीमुळे ते पण अडकले. परंतु, गेले महिनाभर स्वत:ची नोकरी आणि कुटुंबाची चिंता न करता दिवसरात्र हे रुग्णांना रुग्णालयामध्ये सोडणे, त्यांच्या जेवणा-खाण्याची व्यवस्था स्वत:च्या घरातून ते करत आहेत.

मर्चंट नेव्ही ऑफिसर अस्लम मालगुंडकर यांचे मुल गाव संगमेश्वर मध्ये येत असल्याने गावातील लोकांचे जीव वाचविणे हे प्रथम कर्तव्य म्हणून त्यांनी गावातील जे कोरोना बाधित आहेत त्यांना रुग्णालयात नेण्यापासून ते बरे होऊन घरी सोडण्यापर्यंतची सर्व जबाबदारी नेटाने पार पाडत आहेत. गावामधील गोरगरीब आणि ज्यांच्या घरी कर्ता पुरुष माणूस नसलेल्या कुटुंबाला तर ते सर्वतोपरी मदत करत आहेत.

लाटा या नेहमीच येत असतात, तो निसर्गाचा नियम आहे. परंतु, अशा लाटांना घाबरून न जाता धैर्याने त्याचा सामना करायचे ठरवले तर यश निश्चितच मिळणार. समाज संकटात असताना मी नेव्ही ऑफिसर आहे या गुर्मीतच राहिलो तर माणूस म्हणून माझा जन्म फुकट आहे. त्यापेक्षा संकटकाळी आपल्या समाज बांधवाना मदत करण्याचे ध्येय डोळ्यासमोर ठेवून मी कार्य करत असल्याचे  मर्चंट नेव्ही ऑफिसर अस्लम मालगुंडकर यानी सांगितले. या कामात लाईफ केअर हॉस्पिटलचे डॉ. समीर दळवी आणि शासकीय सेवेमध्ये असणाऱ्या नामिरा मालगुंडकर यांचे विशेष सहकार्य लाभल्याचे त्यांनी सांगितले.   

 

RELATED ARTICLES

Most Popular