25.3 C
Ratnagiri
Sunday, November 9, 2025

रेशन दुकानदारांची दिवाळी ‘कडू’, पालकमंत्र्यांना निवेदन देणार

जिल्ह्यातील रेशन दुकानदारांचे जुलै महिन्यापासून थकलेले कमिशन...

४४ कोटींच्या डांबर खरेदीत अनियमितता – बाळ माने

रत्नागिरी पालिकेत २०१४ ते २३ या कालावधीत...

खेर्डी-टेरव मार्ग होणार खड्डेमुक्त, बांधकाम विभागाचे आश्वासन

पुढील पंधरा दिवसांत खेर्डी-टेरव रस्त्यावरील सर्व खड्डे...
HomeRatnagiri'ईव्हीएमने क्या किया - देश का सत्यानाश किया' भारत मुक्ती मोर्चाची रत्नागिरीत...

‘ईव्हीएमने क्या किया – देश का सत्यानाश किया’ भारत मुक्ती मोर्चाची रत्नागिरीत जोरदार घोषणाबाजी

इव्हिएम हटवले गेले नाही तर सनदशीर मार्गानने उग्र आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे.

भारत मुक्ती मोर्चा, ओबीसी मोर्चा, राष्ट्रीय परिवर्तन मोर्चा, बहुजन क्रांती मोर्चाच्या वत्तीने बुधवार दि.१५ ऑक्टोबर रोजी राष्ट्रव्यापी जन आक्रोश (रॅली) मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. त्यांचा भाग म्हणून रत्नागिरी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चाचे नियोजन करणेत आले. मोर्चाची सुरूवात विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा नेण्यात आला. त्यावेळी सर्व आदर्श पुरुष विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा जोतिबा फुले, छत्रपती शाहू महाराजाचा, श्री. कांशीराम यांचा जयजयकार करणेत आला. ‘जय मूळनिवासी’, ‘ईव्हीएमने क्या किया देश का सत्यानाश किया’, ‘गल्ली गल्ली हे शोर है-निवडणूक आयोग चोर है’, ‘ओबीसीची जातवार जनगणना झालीच पाहिजे’, ‘इव्हिएम हटाव देश बचाव’, ‘महाबोधी महाविहार – मुक्त करा’, ‘जग मे बुद्ध का नाम है-यह भारत की की शान है’, ‘मुस्लिम इसाई, बौद्धावरील अन्यायाला वाचा फुटलीच पाहिजे’, ‘आदिवासी वरील अन्यायाला वाचा फुटलीच पाहिजे’, ‘एस./एस.टी./ओबीसी कर्मचारी पदोन्नती व आरक्षणाची अंमलबजावणी झालीच पाहिजे’, अशा घोषणा देणेत आल्या.

मोर्चात जिल्हा बामसेफचे जिल्हाध्यक्ष समाधान पैठणे, भारत मुक्ती मोर्चा जिल्हाध्यक्ष विजय जाधव, बुध्दिस्ट इन्टरनॅशनल नेटवर्कचे जिल्हाध्यक्ष संजय आयरे, भिम आर्मीचे जिल्हाध्यक्ष प्रदिप पवार, बहुजन मुक्ती, पार्टीचे अशोक पवार, कुणबी समाज क्रांती संस्थेचे अध्यक्ष सलिल डाफळे, सामाजिक कार्यकर्ते युयुस आतें, शिवसेना उबाठा गटाचे प्रशांत साळुंखे, राष्ट्रवादी शरद पवार गटाचे जिल्हाध्यक्ष, उबाटा गटाच्या सरपंच नम्रता बिर्जे, राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रदेश सचिव बशीरभाई मुर्तुजा, आर. पी. आय चे प्रकाश जाधव यांनी सहभाग घेतला. बशिरभाई मूर्तृजा म्हणाले की, लोकशाही आणि संविधानाला मोठा धोका असून अनेक कायदे बदल करून देशात फार मोठे षडयंत्र उभे केले जात आहे. इव्हिएम हटवले गेले नाही तर सनदशीर मार्गानने उग्र आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे.

RELATED ARTICLES

Most Popular