28.3 C
Ratnagiri
Wednesday, October 9, 2024

आधी ठेकेदारांकडून पैसे घेणे थांबवावे! पालकमंत्री सामंतांनी लगावला टोला

काहीजण म्हणतात महाविकास आघाडीचे सरकार आल्यानंतर मी...

रेल्वे स्थानकांच्या आज लोकार्पण..

राज्य सरकारच्या सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत जिल्ह्यातील रत्नागिरी,...
HomeRatnagiriकोकण रेल्वे मार्गावर आजपासून आणखी एक समर स्पेशल धावणार

कोकण रेल्वे मार्गावर आजपासून आणखी एक समर स्पेशल धावणार

ही गाडी (०१०१८) आठवड्यातील शनिवार, सोमवार आणि बुधवारी धावणार आहे.

आठवड्यातून ३ दिवस धावणारी अतिरिक्त समर स्पेशल ट्रेन शुक्रवारी २६ एप्रिलपासून कोकण रेल्वे मार्गावर धावणार आहे. मुंबईतील लोकमान्य टिळक टर्मिनस तें गोव्यातील थिवी दरम्यान ही गाडी ४ जूनपर्यंत चालवण्यात येणार आहे. या संदर्भात कोकण रेल्वेकडून प्राप्त झालेल्या माहितीनुसार मुंबईतील लोकमान्य टिळक टर्मिनस ते थिवी – (०१०१७) ही गाडी दिनांक २६ एप्रिल २०२४ ते ४ जून २०१४ पर्यंत एकूण १८ फेऱ्या करणार आहे. लोकम ान्य टिळक टर्मिनस ते थिवी दरम्यान ही गाडी दर शुक्रवार, रविवार, तसेच मंगळवारी धावेल. याचबरोबर उलट दिशेच्या प्रवासात थीवी ते लोकमान्य टिळक टर्मिनस दरम्यान ही गाडी (०१०१८) दिनांक २७ एप्रिल २०२४ ते ५ जून २०२४ या कालावधीत आठवड्यातील शनिवार, सोमवार आणि बुधवारी धावणार आहे.

दोन्ही दिशांनी मिळून ही गाडी ३६ फेऱ्या करणार आहे. दिनांक २६ एप्रिल २०२४ पासून कोकण रेल्वे मार्गावर धावणारी ही गाडी १७ एलएचबी डब्यांची असेल. ही गाडी मुंबईतील लोकमान्य टिळक टर्मिनस येथून रात्री १० वाजून १५ मिनिटांनी सुटेल आणि गोव्यातील थिवी स्थानकावर ती दुसऱ्या दिवशी सकाळी ९ वाजून ५० मिनिटांनी पोहोचेल. परतीच्या प्रवासात ही गाडी थीवी स्थानकावरून ४ वाजून ३५ मिनिटांनी सुटून दुसऱ्या दिवशी पहाटे लोकमान्य टिळक टर्मिनसला ३ वाजून ४५ मिनिटांनी पोहोचेल. एलटीटी-थीवी दरम्यान थांबणार या स्थानकांवर ही अतिरिक्त समर स्पेशल गाडी ठाणे, पनवेल, रोहा, माणगाव, वीर, खेड, चिपळूण, सावर्डे, संगमेश्वर, रत्नागिरी, आडवली, विलवडे, राजापूर रोड, वैभववाडी, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ, तसेच सावंतवाडी स्थानकावर थांबे घेणार आहे.

RELATED ARTICLES

Most Popular