26.4 C
Ratnagiri
Tuesday, June 24, 2025

रत्नागिरी नगरपरिषदेत सत्ता मिळविण्यासाठी राजकीय डावपेच…

रत्नागिरी नगर परिषद निवडणूकीचे मतलई वारे आता...

विद्यार्थ्याच्या मृत्यूप्रकरणी डॉक्टरच्या चौकशीचे आदेश…

खेड तालुक्यातील तळे कासारवाडी येथे नुकत्याच दहावी...

चिपळूण-कऱ्हाड मार्ग अवजड वाहनांसाठी बंदच…

कोयना ते पाटणदरम्यानच्या पुलाचे बांधकाम सुरू असताना...
HomeRatnagiriतवसाळ ते जयगड खाडीपूल ७०० कोटींचा, पर्यायी सागरी महामार्ग

तवसाळ ते जयगड खाडीपूल ७०० कोटींचा, पर्यायी सागरी महामार्ग

बाणकोट आणि दाभोळ खाडीपुलांच्या निविदा ७ जूनला उघडण्यात येणार आहेत.

कोकणातील मुंबई-गोवा महामार्गाला पर्याय म्हणून पाहिल्या जाणाऱ्या सागरी महामार्ग उभारणीसाठी वेगाने पावले उचलली जात आहेत. रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या ३ जिल्ह्यांतील ८ खाडीपुलांपैकी ६ खाडीपुलांची निविदा प्रक्रिया पूर्ण झाली आहे. त्यात रत्नागिरी जिल्ह्यातील तवसाळ ते जयगड जोडणारा खाडीपूल ७०० कोटींचा आहे. बाणकोट आणि दाभोळ खाडीपुलांच्या निविदा ७ जूनला उघडण्यात येणार आहेत. महाराष्ट्र राज्य रस्तेविकास महामंडळातर्फे सागरी महामार्गाचे काम केले जात आहे. रत्नागिरी आणि गुहागर या दोन तालुक्यांना जोडणारा तवसाळ ते जयगड या पुलाच्या बांधकामाची पूर्वतयारी सुरू झाली आहे. जमिनीत तसेच खाडीच्या तळाशी असलेल्या भूभागाच्या परीक्षणाचे कामही सुरू झाले आहे. पावसाळ्यानंतर प्रत्यक्ष पुलाच्या बांधकामाला सुरुवात होईल. त्यासाठी या ठेकेदाराने तवसाळमध्ये सुमारे २ एकर जागेत कामगारांसाठी वसाहत, काँक्रिट प्लांट, पुलाचे गर्डर तयार करण्यासाठी रॅम्प, लोखंडी सळ्यांच्या जोडणीसाठी स्वतंत्र शेड अशा उभारणीला सुरुवात केली आहे.

बहुचर्चित सागरी महामार्गावरील सर्वात लांब पूल धरमतर खाडीवर बांधण्यात येत आहे. या पुलाची लांबी १०.२ कि.मी. इतकी आहे. अगारदांडा खाडीपूल ४.३ कि.मी., कुंडलिका खाडीपूल ३.८ कि.मी., जयगड खाडीपूल ४.४, काळबादेवी खाडीपूल १.८ कि.मी. आणि कुणकेश्वर येथील समुद्रकिनाऱ्यावरून जाणारा पूल १.६ कि.मी. लांबीचा आहे. या सर्व पुलांच्या निविदा प्रक्रिया पूर्ण झाल्या असून, ठेकेदारांनी कामाला सुरुवात केली आहे. यापैकी काही पूल हे केबलच्या आधाराने उभारण्यात येणार आहेत.

प्रवाशांकडून फेरीबोटीचा आधार – सागरी महामार्गावर दाभोळ-धोपावे, तवसाळ जयगड, वेस्वी-बागमांडला, दिघी-आगरदांडा असे खाड्यांच्या दोन्ही किनाऱ्यांवरील गावे फेरीबोटीने जोडलेली आहेत. या फेरीबोटीमधून सर्व प्रकारच्या वाहनांची वाहतूक होते. त्यामुळे पर्यटक, वाहतूकदारांची सोय होत आहे. अंतर कमी असल्यामुळे इंधन आणि वेळेचीही बचत होते. त्याचबरोबर फेरीबोटीमधून प्रवास करण्यासाठी पर्यटकांचीही गर्दी होत असते. खाडीपूल झाल्यानंतर याच वाहनचालकांना फेरीबोटीचा आधार घ्यावा लागणार नाही.

RELATED ARTICLES

Most Popular