25.4 C
Ratnagiri
Monday, September 1, 2025

कोत्रेवाडीतील कचरा प्रकल्पाला विरोध कायम, उपोषणकर्त्यांकडे प्रशासनाचे दुर्लक्ष

कोत्रेवाडी येथील प्रस्तावित डंपिंग ग्राऊंड हटावसाठी ग्रामस्थांनी...

आरवली-संगमेश्वर ते बावनदी येथील खड्डे जैसे थे

राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनी आरवली-संगमेश्वर ते बावनदी...

मुंबई-गोवा महामार्गासाठी ना. योगेश कदम यांचे गणपतीबाप्पाला साकडे

पुढच्या वर्षी महामार्ग पूर्ण होईल असे दरवर्षी...
HomeMaharashtraठाण्यातील भोंदू बाबाकडून स्वत:च्याच पुतण्याचा नरबळी देण्याचा अघोरी प्रकार

ठाण्यातील भोंदू बाबाकडून स्वत:च्याच पुतण्याचा नरबळी देण्याचा अघोरी प्रकार

ठाणे येथील एका भोंदू बाबाने भूत उतरवतो सांगून एका मुलाचा नरबळी देण्याचा प्रयत्न केला.

ग्रामीण भागामध्ये काळी जादू, तंत्र मंत्र, काळी विद्या अशा जादूटोण्याच्या गोष्टी सऱ्हासपणे घडत असतात. पण अजूनही अनेक जण अशा काळ्या जादूच्या आहारी गेल्याने नरबळी सारख्या अघोरी प्रकारावर विश्वास ठेवून आप्तस्वकीयांचा देखील बळी देताना मागचा पुढचा विचार करत नाहीत.

महाराष्ट्रात अंधश्रध्देच्या आहारी जावून नरबळीसारख्या घटना घडत आहेत. जादूटोण्याचे प्रकार दिवसेंदिवस वाढताना दिसून येत आहेत. ठाणे येथील एका भोंदू बाबाने भूत उतरवतो सांगून एका मुलाचा नरबळी देण्याचा प्रयत्न केला. मात्र भोंदूबाबाच्या भावाने पोलिसांना याची माहिती दिल्याने अल्पवयीन मुलाचा जीव वाचवण्यात पोलिसांना यश मिळाले आहे.

पोलिसांनी या प्रकरणात भोंदू बाबाच्या २ साथीदारांना अटक केली असून, या भोंदू बाबाच्या ऑफिसमधून पोलिसांनी ६ लाख रुपये किंमतीचा मुद्देमाल आणि एक चारचाकी गाडी जप्त केली आहे. तसेच या भोंदू बाबाचे अकाऊंट देखील पोलिसांनी सील केल आहे. ठाण्यातील चितळसर मानपाडा पोलीस ठाण्यात नरबळी देण्यासाठी एका अल्पवयीन मुलाचा लैंगिक छळ करून त्या मुलाचा नरबळी देण्यासाठी वापर करणार असल्याची तक्रार भोंदूबाबाच्या भावाने नोंदवली.

हा अल्पवयीन मुलगा त्या भोंदूबाबाच्या भावाचाच मुलगा म्हणजे त्याचा पुतण्या आहे. त्यामुळे घटनेचे गांभीर्य लक्षात घेत पोलिसांनी या प्रकरणाचा गुन्हा नोंद करत तात्काळ तपासाला सुरुवात केली. या दरम्यान पोलिसांनी अटक केलेल्या भोंदू बाबाचे नाव कुलदीप निकम असे आहे. त्याला पोलिसी खाक्या दाखवत कसून चौकशी केली असता, या प्रकरणामध्ये अजून दोन आरोपी सहभागी असल्याचे आढळून आल्याने, पोलीसानी संशयित म्हणून आणखी दोन आरोपींना ताब्यात घेतले आहे. त्या दोन आरोपींमध्ये एका महिलेचा देखील समावेश असून त्यांची नवे किशोर नवले आणि स्नेहा शिंदे अशी आहेत. पुढील तपास आणि कारवाई पोलिसांमार्फत सुरु आहे.

RELATED ARTICLES

Most Popular