27.1 C
Ratnagiri
Monday, September 1, 2025

कोत्रेवाडीतील कचरा प्रकल्पाला विरोध कायम, उपोषणकर्त्यांकडे प्रशासनाचे दुर्लक्ष

कोत्रेवाडी येथील प्रस्तावित डंपिंग ग्राऊंड हटावसाठी ग्रामस्थांनी...

आरवली-संगमेश्वर ते बावनदी येथील खड्डे जैसे थे

राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनी आरवली-संगमेश्वर ते बावनदी...

मुंबई-गोवा महामार्गासाठी ना. योगेश कदम यांचे गणपतीबाप्पाला साकडे

पुढच्या वर्षी महामार्ग पूर्ण होईल असे दरवर्षी...
HomeKhedखेडमध्ये महिपतगडावरील दरवाजा झाला मोकळा

खेडमध्ये महिपतगडावरील दरवाजा झाला मोकळा

मोहिमेत महिपतगडाच्या खेड दरवाजाचा उंबरठा दुर्गवीरांना आढळून आला होता.

महिपतगडावरील अनेक बुरूज पायवाटा व आजूबाजूचा परिसर दुर्गवीर प्रतिष्ठानच्या मावळ्यांनी स्वच्छ केला. या आधीच्या मोहिमेत महिपतगडाच्या खेड दरवाजाचा उंबरठा दुर्गवीरांना आढळून आला होता. त्या वेळी दुर्गवीरांनी स्वच्छतेचा संकल्प केला होता. महिनाभरात या संदर्भातील मोहीम आखून दोन दिवसांत स्थानिक दुर्गवीर, मुंबई, माणगाव आणि देवरूख येथील एकूण ३७ दुर्गवीरांनी एकत्र येऊन गडाचा खेड दरवाजा मुक्त केला. पूर्णतः दगडाच्या मातीखाली हा दरवाजा गाडला गेला होता. त्यावरील दगड आणि माती बाजूला करण्यात आली. एकेक पायरी मोकळी होऊ लागली आणि बघता बघता गडाचा मुख्य दरवाजा दिसू लागला. खेड दरवाजा पाहायला मिळाल्याने प्रत्येक दुर्गवीराच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत होता. दोन दिवसांत दुर्गवीराने खूप मोठी कामगिरी केली आहे. स्थानिकांचे कित्येक दिवसांपासूनचे स्वप्न अखेर पूर्ण झाले.

या मोहिमेत मुंबईमधून दुर्गवीर अर्जुन दळवी, जयवंत कोळी, विशाल इंगळे, विवेक कोळी, प्रतीक पाटेकर. रायगडमधून विठ्ठल केंबळे, प्रमोद डोंगरे, सिद्धांत शिंदे, सुयोग पाटील, प्रसाद आयरे तर देवरूखमधून योगेश सावंत, निशांत जाखी, हर्षद सनगले, उत्कर्ष माने, प्रणव राक्षे, अक्षय गवंडी, ओंकार सावंत, दीप्ती दळवी, प्रतीक्षा बाईत, सेजल वास्कर, राहुल रहाटे तर खेडमधील स्थानिक दुर्गवीर रोहित बालडे, राकेश इंदुलकर, स्वप्नील पाडावे, मिथुन दिवेकर, जय पाटील, शैलेश आखाडे, प्रसाद घाणेकर, रोहित म्हादलेकर, सौरभ म्हादलेकर, प्रणव शेठ, वेदश्री इंदुलकर, संस्कृती पाडावे तसेच छोटे दुर्गवीर श्रीरंग इंदुलकर, अर्णव पाडावे, वृंदा इंदुलकर, त्रिशा पाडावे यांनी सहभाग घेतला होता. अजूनही दरवाजाचा आतील, बाहेरील भाग आणि असंख्य वास्तू संवर्धनाच्या प्रतीक्षेत आहेत. या पुढील मोहिमांमध्ये कोकणवासीयांनी सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

RELATED ARTICLES

Most Popular