31.3 C
Ratnagiri
Friday, May 24, 2024

विनाकारण त्रास द्याल तर गप्प बसणार नाही आ. अनिल परबांचा इशारा

विनाकारण त्रास द्याल, खोटे गुन्हे दाखल कराल...

रत्नागिरीजवळ अपघात रिक्षाचालकाचा मृत्यू

रिक्षाचे ब्रेक निकामी झाल्याने रिक्षा पलटी होऊन...

दापोलीतील महिलेच्या मृत्यूचे गूढ वाढले, नातेवाईकांना घातपाताचा दाट संशय

तालुक्यातील वणंद येथील ५० वर्षीय महिलेच्या मृत्यूचे...
HomeEntertainmentद फॅमिली मॅन वेब सीरिज पार्ट-२

द फॅमिली मॅन वेब सीरिज पार्ट-२

अमेझॉन प्राइम व्हिडिओवर एक भाग प्रक्षेपित झालेली ज्यामध्ये प्रमुख भूमिकेमध्ये मनोज बाजपेयी आहे. प्रेक्षक द फॅमिली मॅन या वेब सीरिजच्या दुस-या भागाबद्दल उत्सुक दिसत आहेत. अखेर प्रेक्षकांची प्रतिक्षा संपुष्टात आली आहे. या वेब सीरिजचा टीझर आज रिलीज करण्यात आला असून याच्या प्रदर्शनाची अधिकृत तारीखही जाहीर करण्यात आली आहे. अमेझॉन प्राइम व्हिडिओवर 4 जून रोजी ही वेब सीरिज प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. या वेब सीरिजची निर्मिती डी राज व डीके यांनी केली आहे.

या वेब सीरीज मध्ये फॅमिली मॅन असलेला श्रीकांत तिवारी या सीझनमध्‍ये नवीन, शक्तिशाली व क्रूर प्रतिस्‍पर्धी असणार्या राजीचा सामना करताना दिसणार आहे. राजीच्या भूमिकेमध्ये दक्षिणात्य नायिका सामंथा अक्किनेनी दिसणार आहे. या सीरिजच्‍या दुसर्या भागामध्ये 9 भागांचा समावेश करण्यात आला आहे. या दुसर्या नवीन सीझनमध्‍ये श्रीकांत एका मध्‍यमवर्गीय फॅमिली मॅन तसेच प्रोफेशनली एक जागतिक दर्जाचा गुप्‍तहेर अशा प्रकारच्या दुहेरी भूमिकेमध्ये काम कारताना दिसणार आहे. यामध्ये गुप्तहेर बनून देशाचे घातक हल्‍ल्‍यापासून संरक्षण करण्‍याचा प्रयत्‍न करताना बघायला मिळणार आहे. या ऍक्शन-ड्रामाने भरलेल्‍या सीरिजच्या आगामी सीझनमध्ये रोमांचपूर्ण नवीन ट्विस्‍ट्स आणि अनपेक्षित क्‍लायमॅक्‍सने भरलेल्या श्रीकांतला दुहेरी भूमिकेमध्ये पर्सनल आणि प्रोफेशनल दोन्ही विश्‍वांची लक्षवेधक झलक बघायला मिळणार आहे.

family man on amazon

अमेझॉन प्राइम व्हिडिओच्‍या इंडिया ओरिजिनल्‍सच्या प्रमुख अपर्णा पुरोहित या वेब सिरीजच्या ट्रेलरबद्दल बोलताना म्‍हणाल्या, आमच्या बहुतांश सर्वच वेब सिरीजची पात्रं घराघरांमध्‍ये प्रसिद्ध आहेत आणि यासारखा निव्वळ दुसरा आनंद नाही. ही वास्‍तववादी कथा असून, फॅमिली मॅन असलेल्या श्रीकांत तिवारीला मिळणारे भरभरून प्रेम व त्यांची होणारी प्रशंसा नक्कीच योग्य आणि उत्तम आहे. या अशा वेब सीरीज सर्व मर्यादांना मोडून काढण्‍याबाबत असलेल्‍या आमच्‍या विश्‍वासाला अजूनच घट्ट बनवतात. द फॅमिली मॅन वेब सीरीजचा हा दुसरा सीझन अधिक रोमांचक, अधिक जटिल, गुंतागुंतीचा आणि अधिक ऍक्शन ड्रामाने भरलेला असणार आहे. आम्‍हाला पूर्ण विश्‍वास आहे की, चाहते श्रीकांत आणि त्‍याच्‍या प्रतिस्‍पर्धी राजीमधील नोकझोक पाहण्‍यासाठी नक्कीच उत्‍सुक असणार आहेत.

निर्माते राज व डीके सांगतात, एक निर्माता म्‍हणून आम्‍ही स्वतः आज द फॅमिली मॅनच्या बहुप्रतिक्षित नवीन सीझनचा ट्रेलर शेअर करण्‍यासाठी दीर्घकाळापासून उत्सुक आहोत. आम्ही खात्रीशिर रित्या सांगू शकतो कि, हा सीझन यंदाच्‍या उन्‍हाळ्याच्‍या शेवटपर्यंत प्रदर्शित होईल. आम्‍ही आमचे वचन पाळायला नेहमीच कटिबद्ध आहोत. श्रीकांत तिवारी नवीन दुहेरी थरारक पटकथेमध्ये समोर येणार आहे आणि सोबतच प्रतिभावान कलाकार देखील काम करत आहेत.

RELATED ARTICLES

Most Popular