जगभरामध्ये कोरोनाच्या तिसऱ्या लाटेबद्दल अनेक तर्क-वितर्क आणि अफवा मोठ्या प्रमाणात पसरत आहेत. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी ट्वीटरवर सिंगापुर मधील कोरोनाच्या नव्या स्ट्रेन बद्दल काही चुकीची माहिती पोस्ट केली आहे आणि हा स्ट्रेन लहान मुलांमध्ये किती धोकादायक ठरू शकल्याचे याबाबत चुकीची माहिती शेअर केली आहे. त्यासोबतच हा स्ट्रेन कोरोनाच्या तिसऱ्या लाटेच्या रूपामध्ये भारतामध्ये पसरण्याची शक्यता नाकारता येत नाही असेही ते म्हणाले. सिंगापूरच्या दुतावासानं केजरीवालांच्या या निरर्थक ट्वीटला उत्तर देत भारतीय दुतावासातील अधिकाऱ्यांना सूचित केल. मात्र, यावरून परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी अरविंद केजरीवाल यांच्यावर सडकून टीका केली. दरम्यान, केंद्राने दिलेल्या स्पष्टीकरणानंतर सिंगापुरमध्ये शांतता प्रस्थापित झाली. परंतु, यानंतरही अशा अफवा अथवा खोट्या बातम्या कुठेही पसरू नये यासाठी सिंगापुरने याविरोधात मोठं पाऊल उचललं आहे. सिंगापूर सरकारनं अॅन्टी मिसइनफॉर्मेशन अॅक्ट म्हणजे प्रोटेक्शन फ्रॉम ऑनलाईन फॉल्सहुड अँड मॅनिप्युलेशन लॉ (POFMA) कायदा लागू केला आहे. हा कायदा सिंगापूरमध्ये ऑनलाइन बनावट वृत्त पसरवण्यात येणाऱ्याना रोखण्यासाठी बनवण्यात आलेला आहे. थेट अरविंद केजरीवाल किंवा भारतातील सोशल मीडियाविरोधामध्ये हा कायदा सिंगापूरनं अद्याप लागू केला नसला तरी सिंगापुरमध्ये स्थानिक स्वरूपामध्ये खोटं वृत्त पसरण्यापासून रोखण्यासाठी हा कायदा लागू केला आहे.
सिंगापूरच्या आरोग्य मंत्रालयानं POFMA कार्यालयाला सर्व सोशल मिडिया साईटसना जसे फेसबुक, ट्विटर आणि तेथील स्थानिक सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना करण्यात आलेल्या सामान्य सुधारणा संबंधी सूचना जारी करण्यास सांगितलं आहे. याचा अर्थ सिंगापूरमध्ये हा कायदा लागू झाल्यावर कोणतीही सोशल नेटवर्क साईट फेसबुक, ट्विटर आणि स्थानिक हार्डवेअर झोन डॉट कॉम समवेत सोशल मीडिया कंपन्यांना सिंगापूरमध्ये सर्व एंड युझर्सला दुरुस्ती करण्यासाठी नोटीस पाठवली जाईल. याचाचं अर्थ यापुढे कोणतीही अफवा पसरवणारी बातमी सिंगापूरमध्ये प्रक्षेपित केली जाणार नाही. अरविंद केजरीवाल यांनी केलेल्या वक्तव्याबाबतही कोणतीचं माहिती सिंगापूरमध्ये दाखवली जाणार नाही.
सिंगापूरच्या आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार जर आता सोशल मीडिया कंपन्यांनी सिंगापूर व्हेरिअंट संबंधीत पसरवलेल्या खोट्या वृत्ताबाबतीत एंड युझर्सना एक करेक्शन आणि स्पष्टीकरण द्यावं लागणार आहे, त्याच सोबत असे कोणत्याही प्रकारचं धोकादायक सिंगापूर व्हेरिअंट उपलब्ध नाही आणि तसा त्याबद्दल कोणता सबळ पुरावाही नाही की तो मुलांसाठी अधिक धोकादायक आहे, हे त्यांना त्यामध्ये स्पष्ट करावे लागेल. सिंगापूर आणि भारतासकट अख्ख जग कोरोना विरोधातील लढाई लढत आहेत. कोरोनाच्या लढाईमध्ये सिंगापूरने भारताला केलेल्या मदती बाबत आभार. सिंगापूर लष्कराकडून विमानमार्गे भारतात आलेली मदत दोन्ही देशांमधील नाते किती घट्ट आहे, याचे उदाहरण आहे. मात्र, दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांनी केलेलं वक्तव्य हे भारत देशाचे अधिकृत वक्तव्य नसल्याच स्पष्ट करू इच्छितो, असं परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी सिंगापूरच्या परराष्ट्रमंत्र्यांनी केलेल्या ट्वीटवर प्रतिक्रिया देत सांगितलं. तर दुसरीकडे एक ट्वीट करून दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची सुद्धा कानउघडणी केली आहे, दिल्लीचे मुख्यमंत्री भारता संदर्भात मते प्रदर्शित करू शकत नाही, असं स्पष्ट करतो, या कठोर शब्दांत एस. जयशंकर यांनी अरविंद केजरीवाल यांना सुनावलं आहे. व अशा प्रकारची बेजबाबदार वक्तव्ये करून दोन देशांमध्ये दीर्घ काळापासून चालत आलेल्या भागीदारी आणि चांगल्या संबंधांवर विपरीत परिणाम करू शकतात, हे एक जबाबदार नागरिक म्हणून समजायला पाहिजे होते.