25.8 C
Ratnagiri
Saturday, August 30, 2025

शिंदेंच्या मंत्र्यांवर लक्ष ठेवण्यासाठी अधिकारी…

राज्यात महायुती असली तरीही भाजपकडून कुरघोडींचे राजकारण...

पेढांबेतील पूल दुरुस्तीच्या प्रतीक्षेत, अवजड वाहतूक बंद

दुरुस्तीअभावी धोकादायक झालेला पेढांबे येथील जुन्या पुलावरून...

जनआरोग्य योजनेतील कार्ड बनवा : एम. देवेंदर सिंह

एकत्रित आयुष्मान भारत प्रधानमंत्री जनआरोग्य योजना, महात्मा...
HomeRatnagiriईपीएस वाढीव पेन्शनचे ऑफलाईन फॉर्म या वारी भरले जाणार

ईपीएस वाढीव पेन्शनचे ऑफलाईन फॉर्म या वारी भरले जाणार

ईपीएफओने वाढीव वेतनावरील पेन्शनसंदर्भात अर्ज करण्याची तारीख वाढवली असून, या सुविधांचा लाभ घ्यावा, असे आवाहन क्षेत्रीय कार्यालयांनी केले आहे.सर्वोच्च न्यायालयाने १ सप्टेंबर २०१४ पूर्वी निवृत्त झालेले आणि निवृत्तीपूर्वी परिच्छेद ११(३) अन्वये पर्याय वापरलेले कर्मचारी जास्त वेतनावर पेन्यानसाठी पात्र असतील, असे म्हटले होते. २९/१२/२०२२ आणि दिनांक ०२/०१/२०२३ च्या परिपत्रकाद्वारे क्षेत्रीय कार्यालयांना या संदर्भातील सूचना देण्यात आल्या होत्या. त्यासाठी अर्ज सादर करण्यासाठी ऑनलाईन सुविधा ०१/०९/२०१४ पुवी निवृत्त झालेल्या आणि संयुक्त पर्यायाचा वापर केलेल्या कर्मचा-यांना संयुक्त पर्यायाच्या वैधतेसाठी अर्ज सादर करण्यासाठी ऑनलाईन सुविधा ईपीएफओ वेबसाईटवर दि. ०३/०३/२०२३ पर्यंत प्रदान केली गेली होती.

आता कर्मचारी नियोक्ता संघटनांच्या मागणीनुसार केंद्रीय विश्वस्त मंडळाच्या अध्यक्षांनी अशा कर्मचा-याकडुन संयुक्त पर्यायाच्या वैधतेसाठी अर्ज सादर करण्याची मुदत ३ मे २०२३ पर्यंत वाढवली आहे. ऑनलाईन सुविधा ईपीएफओ वेबसाईटवर उपलब्ध असून, सुविधांचा लाभ घेण्याचे आवाहन श्री. संजय शंकर नागवेकर, रामचंद्र भोजे, सदस्य ई.पी.एस. १९९५ कल्याणकारी संस्था अहमदनगर यांनी केले असून ते प्रत्येक शनिवारी दि. ०८, १५,२२, २९ रोजी सकाळी १० ते २ वाजेपर्यंत जिल्हाधिकारी पोस्ट ऑफीस समोर, आजगांवकरवाडी, रत्नागिरी येथे ऑफलाईन फॉर्म भरण्यासाठी उपस्थित रहाणार आहेत.

RELATED ARTICLES

Most Popular