25.3 C
Ratnagiri
Tuesday, September 2, 2025

कोत्रेवाडीतील कचरा प्रकल्पाला विरोध कायम, उपोषणकर्त्यांकडे प्रशासनाचे दुर्लक्ष

कोत्रेवाडी येथील प्रस्तावित डंपिंग ग्राऊंड हटावसाठी ग्रामस्थांनी...

आरवली-संगमेश्वर ते बावनदी येथील खड्डे जैसे थे

राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनी आरवली-संगमेश्वर ते बावनदी...

मुंबई-गोवा महामार्गासाठी ना. योगेश कदम यांचे गणपतीबाप्पाला साकडे

पुढच्या वर्षी महामार्ग पूर्ण होईल असे दरवर्षी...
HomeKokanयंदा हापूस आंब्याचा मोसमच लांबणीवर, वाशी मार्केटमध्ये जाणाऱ्या पेट्यांची संख्या घटली

यंदा हापूस आंब्याचा मोसमच लांबणीवर, वाशी मार्केटमध्ये जाणाऱ्या पेट्यांची संख्या घटली

यंदा मात्र अवकाळी आणि वारंवार होत असलेल्या बदलामुळे बाजारात दाखल होणाऱ्या हापूसच्या पेट्यांची संख्याच रोडावली आहे.

रत्नागिरी हापूस हे नाव जरी ऐकल तरी तोंडाला पाणी सुटत. परंतु यंदा हापूस आंब्याचा मोसमच लांबणीवर पडला आहे. वातावरणात सतत होत असलेला बदल, उष्मा, थंडी आणि पावसाचे बिघडलेले समीकरण त्यामुळे फळ प्रक्रिया लांबली आहे. सध्याच्या मोसमामध्ये कैऱ्याची वाढ हळू हळूहळू व्हायला सुरुवात झाली आहे.

अवकाळी पाऊस, आधी मधी पडणारी थंडी आणि वाढलेला उन्हाचा कडाका याचा मोठा फटका यंदा कोकणातील प्रमुख पीक असलेल्या हापूस आंब्याला बसला आहे. कोकणातील शेतकऱ्याचं आर्थिक गणित त्यामुळे पुरात ढासळून गेले आहे. या गोष्टीचा परिणाम केवळ विक्रेत्यांवर झालेला नसून, याचा परिणाम थेट हापूसची आतुरतेने वाट पाहणाऱ्या देश विदेशातील आंबा प्रेमींच्या खिशावर झाला आहे. कारण, कोकणातून गुढीपाडव्याच्या मुहूर्ताला नवी मुंबईतील वाशी मार्केटमध्ये जाणाऱ्या पेट्यांची संख्या कमी झाली आणि दर मात्र तेवढे वाढलेलेच होते. त्यामुळे सर्व सामान्याला मात्र हापूसची चव चाखता येणे कठीण झालं आहे.

कोकणातील रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या दोन जिल्ह्यातून गुढीपाडव्याचा मुहूर्त साधत आंबा बागायतदार आपल्या हापूस व्यवसायाचा श्रीगणेशा करतात. मोठ्या प्रमाणात पेट्या बाजारात दाखल होतात. सर्वसामान्यांपासून प्रत्येक जण यावेळी आंबा खरेदी करतो. पण, यंदा मात्र अवकाळी आणि वारंवार होत असलेल्या बदलामुळे बाजारात दाखल होणाऱ्या हापूसच्या पेट्यांची संख्याच रोडावली आहे.

रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातून निर्यातीसाठी वाशी मार्केटला पाडव्याच्या मुहूर्ताला जाणाऱ्या पेट्या मागील काही वर्षातल्या पेट्यांच्या तुलनेत ही संख्या ३० टक्क्यांनी घातली असल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे सर्व हापूस आंबा प्रेमीना सर्व साधारण दाराला आंबा कधी चाखायला मिळणार याबाबत शंका निर्माण झाली आहे.

RELATED ARTICLES

Most Popular