26.3 C
Ratnagiri
Wednesday, September 3, 2025

कोत्रेवाडीतील कचरा प्रकल्पाला विरोध कायम, उपोषणकर्त्यांकडे प्रशासनाचे दुर्लक्ष

कोत्रेवाडी येथील प्रस्तावित डंपिंग ग्राऊंड हटावसाठी ग्रामस्थांनी...

आरवली-संगमेश्वर ते बावनदी येथील खड्डे जैसे थे

राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनी आरवली-संगमेश्वर ते बावनदी...

मुंबई-गोवा महामार्गासाठी ना. योगेश कदम यांचे गणपतीबाप्पाला साकडे

पुढच्या वर्षी महामार्ग पूर्ण होईल असे दरवर्षी...
HomeRatnagiriयंदा कोकणात २२ डब्यांच्या आठ रेल्वेगाड्या धावणार

यंदा कोकणात २२ डब्यांच्या आठ रेल्वेगाड्या धावणार

नव्या संरचनेनुसार उत्सव विशेष फेऱ्या एलएचबी रेल्वेगाड्यांऐवजी आयसीएफ रेल्वेगाडीमध्ये धावणार आहे.

गणेशोत्सवानिमित्त मध्य- कोकण रेल्वेने आणखी चार रेल्वेगाड्यांना प्रत्येकी दोन डबे आणि दिवा-चिपळूण मेमूला चार डबे जोडण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे यंदा कोकणात २२ डब्यांच्या आठ रेल्वेगाड्या धावणार असून, गणेशोत्सवासाठी जाणाऱ्या प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे. गाडी क्रमांक ०११६५ / ६ एलटीटी- मंगळुरू-एलटीटी एक्स्प्रेस (१६ फेऱ्या), गाडी क्रमांक ०११६७/८ एलटीटी-कुडाळ- एलटीटी एक्स्प्रेस (२४ फेऱ्या) रेल्वे गाड्यांना प्रत्येकी दोन डबे जोडण्यात येणार आहेत. गाडी क्रमांक ०११५५ / ६ दिवा-चिपळूण- दिवा मेमूला (३६ फेऱ्या) प्रत्येकी चार डबे जोडण्यात येणार आहे.

यामुळे आठ डब्यांची मेमू आता १२ डब्यांची धावणार आहे. गाडी क्रमांक ०११५१ / २ छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस-मडगाव- छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस आणि ०११७१ / २ सीएसएमटी- सावंतवाडी रोड-सीएसएमटी या दोन्ही गाड्यांच्या २२ फेऱ्या २२ डब्यांच्या चालवण्याचा निर्णय मध्य आणि कोकण रेल्वे प्रशासनाने घेतला आहे. नव्या संरचनेनुसार उत्सव विशेष फेऱ्या एलएचबी रेल्वेगाड्यांऐवजी आयसीएफ रेल्वेगाडीमध्ये धावणार आहे. २० शयनयान श्रेणीचे डबे आणि दोन डबे सीटिंग कम लगेज या श्रेणीतील असणार आहेत.

RELATED ARTICLES

Most Popular