27.6 C
Ratnagiri
Sunday, April 20, 2025

चर्मालयात व्हावा तातडीने सेवारस्ता, मिऱ्या-नागपूर महामार्गाचे चौपदरीकरण

शहरातून जाणाऱ्या मिऱ्या-नागपूर महामार्गाचे काम युद्धपातळीवर सुरू...

जनता दरबारात माहिती घेऊनच या – मंत्री उदय सामंत

जनतेच्या प्रश्नापेक्षा दुसरे काही मोठे काम असू...
HomeRatnagiriअत्याचार प्रकरणी तिघांना घेतले ताब्यात सखोल चौकशीचे पालकमंत्र्यांचे आदेश

अत्याचार प्रकरणी तिघांना घेतले ताब्यात सखोल चौकशीचे पालकमंत्र्यांचे आदेश

या घटनेनंतर लोकांमध्ये प्रचंड रोष निर्माण झाला.

रत्नागिरीतील चंपक मैदानावर नर्सिंग विद्यार्थिनीवर झालेल्या अत्याचार प्रकरणी पोलिसांनी तीन युवकांना ताब्यात घेतले आहे. या तरुणांची सखोल चौकशी सुरू असून शेवटपर्यंत जाऊन या प्रकरणाचा तपास करा अशा सूचना पोलीस खात्यांला दिल्या असल्याची माहिती पालकमंत्री उदय सामंत यांनी पत्रकारांशी बोलताना दिली. रत्नागिरीत नर्सिंगचे शिक्षण घेणाऱ्या युवतीवर सोमवारी सकाळी चंपक मैदान येथे अत्याचार करण्यात आल्याचे उघड झाले. या घटनेनंतर लोकांमध्ये प्रचंड रोष निर्माण झाला.

संतप्त जमावाने सोमवारी रात्री जिल्हा रुग्णालयात निदर्शनं केली. तसेच रस्ता रोको देखील केला. मंगळवारी सकाळी जिल्हा दौऱ्यावर आलेल्या पालकमंत्री ना. उदय सामंत यांनी जिल्हा रुग्णालयात जाऊन पीडित महिलेची आणि तिच्या कुटुंबाची भेट घेतली. यावेळी त्यांच्या सोबत जिल्हा पोलीस दलातील वरिष्ठ अधिकारी देखील उपस्थित होते. या भेटीनंतर बोलताना पालकमंत्री ना. सामंत म्हणाले की घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांना तपास तत्काळ सुरू करण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत.

शेवटपर्यंत जाऊन तपास करा आणि आरोपींचा शोध घ्या अशा सक्त सूचना केल्याची माहिती ना. सामंत यांनी दिली.  हा विषय अत्यंत संवेदनशील असून पीडित युवतीने दिलेल्या जबाबानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आता पर्यंत पोलिसांनी तीन युवकांना पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. या तरुणांची कसून चौकशी सुरू आहे. पीडित युवतीने सांगितलेल्या मार्गावरील सीसीटिव्हीचे फुटेज पोलिसांच्या ताब्यात आहे. त्याचा तपास पोलीस करत असल्याची माहिती ना. सामंत यांनी यावेळी दिली.

RELATED ARTICLES

Most Popular