27.3 C
Ratnagiri
Monday, November 4, 2024

OnePlus चा सर्वात शक्तिशाली फोन 24GB RAM आणि 1TB स्टोरेजसह लॉन्च …

चीनी टेक कंपनी OnePlus च्या नवीन फ्लॅगशिप...

भारतीय फलंदाजी पुन्हा अडचणीत, दहा मिनिटांत भारताची पडझड

बंगळूर आणि पुणे कसोटीत भारतीय संघाच्या पराभवात...
HomeRatnagiriरत्नागिरीतील आरजू टेक्सोल कंपनीच्या दोन संचालकाना अटक

रत्नागिरीतील आरजू टेक्सोल कंपनीच्या दोन संचालकाना अटक

अन्य एक संचालक अद्याप पसार आहे.

आरजू टेक्सोल कंपनीच्या तीन संशयित संचालकांपैकी दोघांना अटक केली. आर्थिक गुन्हे शाखेने ही कारवाई केली. अन्य एक संचालक अद्याप पसार आहे. संजय गोविंद केळकर (वय ४९, रा. घर नं. ३५०, अथर्व हॉटेल शेजारी, तारवेवाडी-हातखंबा, ता. जि. रत्नागिरी), प्रसाद शशिकांत फडके (३४, रा. घर नं. ७२, ब्राह्मणवाडी, रामेश्वर मंदिराजवळ, गावखडी, ता. जि. रत्नागिरी) अशी अटक केलेल्या संशयितांची नावे आहेत. दरम्यान, आजवर कंपनीविरोधात ११५ जणांनी जबाब नोंदविला असून, ही फसवणूक कोट्यवधीची आहे. आतापर्यंत सुमारे दीड कोटींची फसवणूक झाल्याचे पोलिसांनी सांगितले.

आरजू टेक्सोल कंपनीविरोधात ग्रामीण पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल आहे. या गुन्ह्याची व्याप्ती लक्षात घेऊन अधिक तपास रत्नागिरी पोलिस दलाच्या आर्थिक गुन्हे शाखेकडे दिला आहे. या गुन्ह्यात आतापर्यंत दोघा संशयितांना अटक करण्यात आर्थिक गुन्हे शाखेस यश आले आहे. या फसवणूक प्रकरणी आजवर ११५ गुंतवणूकदारांचा जबाब नोंदविला आहे. अटक करण्यात आलेल्या संशयित केळकर यांना न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने ३१ तारखेपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. मास्टरमाईंड अनी जाधव पसार आरजू टेक्सोल कंपनीचा मुख्य सूत्रधार अनी जाधव आहे.

पोलिस त्याच्या शोधात आहेत; मात्र यातील संशयित प्रसाद फडके हा गुन्हा दाखल झाल्यापासून दिल्ली, जोधपूर असा फिरत होता. तो संगमेश्वरात आल्याची माहिती मिळाल्यानंतर आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने त्याला अटक केली. पोलिसांचे आवाहन तक्रार नोंदवू नागरिकांनी कार्यालयीन कामकाजाच्या वेळेत आर्थिक शाखेत भेट द्यावी. जबाब नोंदविण्यासाठी ज्या नागरिकांनी संबंधित कंपनीत गुंतवणूक केली आहे आणि ज्यांच्या तक्रारी नोंदवण्याची इच्छा आहे, अशा नागरिकांनी गुंतवणुकी संदर्भातील पुरावे घेऊन यावे.. टप्प्याटप्याने संपर्क करून बोलावण्यात येईल.

RELATED ARTICLES

Most Popular