21.9 C
Ratnagiri
Friday, November 22, 2024

OPPO Find X8, Find X8 Pro डायमेंसिटी 9400 प्रोसेसर, AMOLED डिस्प्लेसह लॉन्च…

OPPO ने अलीकडेच आपले फ्लॅगशिप स्मार्टफोन OPPO...

‘पुष्पा 2: द रुल’, अल्लू अर्जुनची जादू पुन्हा चालेल…

2021 च्या ब्लॉकबस्टर चित्रपट 'पुष्पा: द राइज'चे...
HomeRajapurराजापुर मध्ये मासेमारीसाठी गेलेल्या दोघांचा बुडून मृत्यू…

राजापुर मध्ये मासेमारीसाठी गेलेल्या दोघांचा बुडून मृत्यू…

एकाने खाडीपात्रामध्ये उतरून त्या दोघांनाही वाचविण्याचा प्रयत्न केला.

नदीपात्रामध्ये मासेमारीसाठी गेलेल्या तालुक्यातील कोंडसर बुद्रुक येथील सुनील केशव घाणेकर (वय ५८) आणि संदीप केशव मोगरकर (वय ४५, दोन्ही रा. कोंडसर बुद्रुक) या दोघांचा बुडून मृत्यू झाला. ही दुर्घटना रविवारी (ता. ३०) सायंकाळी घडली. जोराचा पाऊस आणि काळोख यामुळे रात्री थांबविलेली शोधमोहीम आज सकाळी पुन्हा एकदा सुरू करण्यात आली. बुडालेल्या दोघांचेही मृतदेह दुपारी सापडले असून, घटनास्थळाचा पंचनामा करून ते शवविच्छेदनासाठी रत्नागिरी येथे नेण्यात आल्याची माहिती नाटे पोलिसांनी दिली.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, कॉडसर बुद्रुक येथील मृत सुनील केशव घाणेकर, संदीप केशव मोगरकर यांच्यासह दीपक केशव मोगरकर, तुकाराम शंकर घाणेकर असे चौघेजण रविवारी (३० जून) सायंकाळी ६ च्या दरम्यान कोंडसर बुद्रुक बंधाऱ्या नजीकच्या खाडी नदीपात्रात मासेमारीसाठी गेले होते. यावेळी सुनील केशव घाणेकर हे मासे पकडण्याचे जाळे सोडण्यासाठी खाडीपात्रामध्ये उतरले. मात्र, त्यांना खोल पाण्याचा अंदाज न आल्याने ते बुडू लागले. हे बाब किनाऱ्यावरील सोबत गेलेल्या लोकांच्या लक्षात येताच त्यापैकी संदीप मोगरकर हे त्यांना वाचविण्यासाठी खाडीपात्रामध्ये उतरले. मात्र, त्या दोघांचाही तोल जाऊन ते बुडू लागले.

दरम्यान, किनाऱ्यावर असलेल्या अन्य दोघांपैकी एकाने खाडीपात्रामध्ये उतरून त्या दोघांनाही वाचविण्याचा प्रयत्न केला. तो निष्फळ ठरला. हे दोघेही खोल पाण्यामध्ये बुडाले. दरम्यान, याबाबतची माहिती किनाऱ्यावर असलेल्यांनी घरी दिली. दुर्घटनेची माहिती मिळताच नातेवाईक, गावातील ग्रामस्थांसह परिसरातील गावातील लोकांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर, बुडालेल्यांची खाडीपात्रामध्ये शोध घेण्याचे प्रयत्न सुरू झाले. मात्र, जोराचा पाऊस आणि रात्र झाल्याने शोध घेण्यात अडचणी येत होत्या. त्यामुळे शोधमोहीम थांबविण्यात आली.

सोमवारी सकाळी पुन्हा एकदा ग्रामस्थांनी खाडीपात्रामध्ये बुडालेल्या दोघांचाही शोध घेतला. मंडल अधिकारी शेवाळे, तलाठी गोरे, ग्रामविकास अधिकारी अनिल पिठलेकर, नाटे सागरी पोलिस ठाण्याचे प्रभारी अविनाश केदारी आणि सहकारी पोलिसांनी घटनास्थळी जाऊन शोधण्यासाठी मदतकार्य केले. दोघांचेही मृतदेह दुपारी बुडालेल्या ठिकाणीच सापडल्याची माहिती पोलिसांनी दिली.

RELATED ARTICLES

Most Popular