ना. उदय सामंत यांनी काल राणे यांनी केलेल्या आरोपन्वर उत्तर दिले. ते म्हणाले, पहिली गोष्ट म्हणजे माझी आणि देवेंद्र फडणवीस यांची गुप्त भेट झाली आणि त्यामध्ये राजकीय खलबत झाली अशा पद्धतीचं ट्विट करणं हे महाराष्ट्राच्या राजकीय संस्कृती मध्ये बसत नाही दुसरी गोष्ट म्हणजे एक गुप्त बैठक ज्याला कुणालाही करायचे असेल तो आपल्या मतदारसंघांमध्ये आणि शासकीय विश्रामगृहात दोनशे लोकांच्या समोर का करेल निलेश राणे यांनी केलेल्या ट्विटमुळे जर आदरणीय मुख्यमंत्री साहेबांचा माझ्यावरचा विश्वास उडेल असं कोणीही समजू नये तो निव्वळ बालिशपणा ठरेल मी स्वतः रत्नागिरी-सिंधुदुर्ग दौऱ्यावर असताना माजी मुख्यमंत्री व विरोधी पक्षनेते श्री देवेंद्र फडणवीस माझ्या समोर आले असता त्यांची सदिच्छा भेट घेणे ही राजकीय संस्कृती आहे तिथे मी प्रामाणिकपणे पालन केले.
मंत्री उदय सामंत यांचा नेहमीचा ढोंग. pic.twitter.com/6gzpA24TMq
— Nilesh N Rane (@meNeeleshNRane) May 25, 2021
ज्यांनी गुप्त बैठक झाली आहे अशा प्रकारचे ट्विट केले आहे त्यांच्या कुठच्याही आरोपावर दाव्यावर मी कधीही स्टेटमेंट देत नाही. त्याची दखल जर जनतेने घेतली नाही तर माझ्यासारख्या मंत्र्यांने का दखल घ्यावी. सदरची बैठक ही बंद खोलीत झाली नसून समोरासमोर झाली व आरोप करणारे देखील माझ्यासमोर बसलेले होते.
मी राजकीय संस्कृती पाळतो म्हणून या गोष्टी सांगत नाही पण जी चर्चा झाली ती फक्त स्वागत या दृष्टीने झाली आणि सगळ्यांच्या समोर झाली. त्यावेळी शिवसेनेचे पदाधिकारी, भाजपाचे पदाधिकारी अगदी आमच्या समोरच होते महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे साहेबांचा आणि आदित्य साहेबांचा माझ्यावर विश्वास आहे त्यामुळे माझं राजकीय जीवन अस्थिर करण्याचा प्रयत्न राणे करत असेल तर असं कधीही होणार नाही दुसरी महत्वाची गोष्ट ऑपरेशन लोटस करण्याची काय गरज आहे भविष्यामध्ये शिवसेनेचा मुख्यमंत्री होणार आहेत महाविकास आघाडी मजबूत आहे.