25.6 C
Ratnagiri
Saturday, December 7, 2024

रहाटाघर बसस्थानकातही आता मोकाट गुरे…

शहरातील मोकाट गुरांच्या प्रश्नाकडे सर्वच यंत्रणांनी डोळेझाक...

नव्या सरकारचा शपथविधी होताच रत्नागिरीत भाजपाचा जल्लोष

राज्याचे नवे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री...

राजापूर पोस्ट कार्यालयातील पीआरएस सुविधेवर लगेच वक्रदृष्टीः सेवा बंद होणार

जिल्हयातील रत्नागिरीसह लांजा, संगमेश्वर आणि राजापूर येथील...
HomeKhedनीलेश राणेंकडून जैतापकरांची समजूत, थेट हेलिकॉप्टरने धाडले गुहागरात

नीलेश राणेंकडून जैतापकरांची समजूत, थेट हेलिकॉप्टरने धाडले गुहागरात

निवडणूक कार्यालयापर्यंत आणले आणि उमेदवारी मार्ग घेण्याच्या अर्जावर जैतापकरांनी स्वाक्षरी केली.

उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या दिवसापर्यंत महायुतीच्या पदाधिकाऱ्यांना हुलकावणी देणाऱ्या संतोष जैतापकरांना अखेरच्या क्षणी माजी खासदार नीलेश राणेंनी खास त्यांच्या शैलीत समजावले. सल्लामसलत करण्यासाठी कणकवलीत गेलेल्या संतोष जैतापकरांना खास हेलिकॉप्टरची सैर घडवून गुहागरात पाठवले. त्यानंतर जैतापकरांनी उमेदवारी अर्ज मागे घेतला. राणे यांनी भाजपसाठी कामगिरी फत्ते केली. भाजपचे ओबीसी सेलच्या जिल्हाध्यक्षपदाचा राजीनामा देऊन जैतापकर यांनी गुहागर विधानसभा मतदार संघातून अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला होता. त्या वेळी केलेल्या शक्तिप्रदर्शनामुळे जैतापकर महायुतीसाठी अडचणीचे ठरू शकतात, असे समोर आले. तेव्हापासून भाजपचे पदाधिकारी जैतापकर उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी प्रयत्न करत होते. प्रत्येकवेळी जैतापकर अर्ज मागे घेणार असल्याचे ठामपणे सांगत होते. जिल्हाध्यक्ष केदार साठे जैतापकरांच्या भेटीला लक्ष्मीपूजनाच्या दिवशी गुहागरला आले; परंतु जैतापकर लक्ष्मीपूजनासाठी मुंबईत निघून गेले. त्यानंतर त्यांनी भाजपच्या पदाधिकाऱ्यांचे फोन उचलणेही बंद केले होते.

आज उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशीही ते नॉट रिवेबल झाले होते. जैतापकर यांनी याच दरम्यान माजी खासदार व कुडाळ मतदारसंघातील शिवसेनेचे उमेदवार नीलेश राणे यांची भेट पक्की केली. राणेंनी देखील आज त्यांना भेटण्यासाठी सिंधुदुर्गात बोलावले. गेले चार दिवस भाजपच्या पदाधिकाऱ्यांना हुलकावणी देणाऱ्या जैतापकरांची ही शेवटची हुलकावणी ठरली. सिंधुदुर्गात पोहोचल्यावर नीलेश राणेंनी त्यांना त्यांच्या खास राणे शैलीत समजावले अन् हेलिकॉप्टरमधून गुहागरला पाठवून दिले. राणेंनीच ही माहिती जिल्हाध्यक्ष केदार साठे यांना दिली आणि सर्वांनीच सुटकेचा निःश्वास सोडला.

केवळ अर्धा तास शिल्लक असताना… – उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी केवळ अर्धा तास शिल्लक असताना शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी आरजीपीपीएलच्या हेलिपॅडवरून जैतापकरांना गुहागरला निवडणूक कार्यालयापर्यंत आणले आणि उमेदवारी मार्ग घेण्याच्या अर्जावर जैतापकरांनी स्वाक्षरी केली.

RELATED ARTICLES

Most Popular