26.4 C
Ratnagiri
Friday, October 18, 2024

अखिल शेओरानचे लक्ष्य कांस्यपदक, दुसरे पदक भारताच्या झोळीत

ISSF विश्वचषक फायनल भारताची राजधानी नवी दिल्ली...

महिला मतदार ठरवणार दापोलीचा आमदार दापोली मतदारसंघ

विधानसभा निवडणूक जाहीर झाली असून, सर्वांनी आचारसंहितेचे...
HomeRatnagiriराज्यघटनेसाठी एकसंध होऊन लढा उभारा - आनंदराज आंबेडकर

राज्यघटनेसाठी एकसंध होऊन लढा उभारा – आनंदराज आंबेडकर

जे जे देशाच्या सर्वोच्च पदावर विराजमान झाले ते राज्यघटनेचे उपकार आहेत.

भारतीय राज्यघटनेने या देशाला स्वातंत्र्यं, समता, बंधुता आणि न्यायाच्या विचार सूत्रात गुंतून समृद्धीच्या उंच शिखरावर नेले आहे. तेच संविधान बदलण्याची भाषा आज केली जात आहे. हा धोका ओळखून समाजातील सर्व जातीधर्मातील नागरिकांनी संविधानवादी, विवेकवादी विचारसरणीच्या सर्वांनी एकत्र येऊन संविधानिक समतामुलुख समाजव्यवस्था निर्माण करण्यासाठी जागरूकतेने एकसंघ होऊन लढा उभारण्याची गरज आहे, असे प्रतिपादन डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे नातू, इंदूमिल आंदोलनाचे प्रणेते आणि रिपब्लिकन सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष आनंदराज आंबेडकर यांनी केले. रत्नागिरी शहरातील पॉलिटेक्निक कॉलेजजवळच्या कार्लेकर मळा येथील बौद्धजन पंचायत समितीच्या मैदानात संविधान बचावयात्रेचे स्वागत बुधवारी सायंकाळी उत्साहात करण्यात आले.

या वेळी महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष समाजभूषण काकासाहेब खंबाळकर, तालुकाध्यक्ष प्रकाश पवार, उपाध्यक्ष विजय आयरे, चिटणीस सुहास कांबळे, उपचिटणीस नरेंद्र आयरे, कोषाध्यक्ष मंगेश सावंत, माजी अध्यक्ष तु. गो. सावंत यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते. प्रारंभी येथील नवीन विहिरीचे उद्घाटन आनंदराज आंबेडकर यांच्या हस्ते करण्यात आले. ही विहीर बौद्धजन पंचायत समितीचे माजी अध्यक्ष तु. गो. सावंत गुरुजी आणि त्यांच्या कुटुंबीयांनी सुमारे साडेतीन लाख रुपयांच्या स्वखचनि बांधून दिली आहे. या प्रसंगी आनंदराज आंबेडकर म्हणाले, ‘भारतीय राज्यघटना टिकवण्यासाठी सर्वांनी एकत्रित आले पाहिजे.

जे जे देशाच्या सर्वोच्च पदावर विराजमान झाले ते राज्यघटनेचे उपकार आहेत. काकासाहेब खंबाळकर म्हणाले, ‘देशात राज्यघटनेला धोका पोहोचवण्याचे काम केले जात आहे. देश वाचवायचा असेल तर ईव्हीएम मशिन ही नाकारली पाहिजेत. संविधान बचावयात्रेचा रथ त्यासाठीच आम्ही येथे आणला आहे. या रथयात्रेचे चांगल्याप्रकारे स्वागत केल्याबद्दल समता सैनिक दलाच्या सर्व टीमचे विशेष कौतुक आहे.

RELATED ARTICLES

Most Popular