एस. टी. महामंडळाने स्वच्छ बसस्थानक व स्वच्छ एस. टी. ही मोहीम हाती घेतली असून हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे स्वच्छ व सुंदर बसस्थानक अभियान राबविले जात आहे. मात्र या अभियानात उत्स्फुर्तपणे सर्वच आगारातील अधिकारी व कर्मचारी सहभागी होऊन आपले आगार अधिक स्वच्छ ठेवण्याचा प्रयत्न आहेत. करत आहेत. मात्र महामंडळाकडून ठेकेदार पद्धतीने चालविण्यास देण्यात आलेल्या आगारांतील सुलभ शौचालयांतील अस्वच्छता अभियानात मोठा अडसर ठरत आहे. त्यामुळे ही सुलभ शौचालये स्वच्छ कधी दिसणार?, असा सवाल आता प्रवाशांतून उपस्थित केला जात ब आहे.
राज्यातील महायुती सरकारने गेल्या काही महिन्यांमध्ये एस. टी. महामंडळाच्या सेवेत सुधारणा करताना प्रवाशांच्या सोयीसुविधांसह एस. टी. कर्मचाऱ्यांबाबतही अनेक चांगले निर्णय घेतले आहेत. त्याचे प्रवासी आणि कर्मचारी वर्गातून स्वागतही होत आहे. या अशा चांगल्या निर्णयामुळे गेल्या काही वर्षांत तोट्यात गेलेले एस. टी. महामंडळ फायद्यात येईल, अशी आशाही निर्माण झाली आहे. आता एस.टी. महामंडळाकडून हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे स्वच्छ व सुंदर बसस्थानक अभियान राबविले जात आहे. या मध्ये आगाराचा परिसर, शौचालय, एस. टी बसची स्वच्छता, प्रवाशांच्या सेवा सुविधा आणि एस. टी. च्या दर तीन महिन्यातील एकूणच कामकाजाचे मूल्यांकन करून गुण दिले जात चिपळूण, खेड, दापोली, गुहागर या या नऊ आगारांसह छोट्या स्थानकांचाही समावेश आहे.
मात्र या स्वच्छता अभियानात सर्वच आगारांतील सुलभ शौचालयांतील अस्वच्छता हा कळीचा मुद्दा ठरत आहे. राजापूर, रत्नागिरी, चिपळूण, खेड, संगमेश्वर, दापोली या आगारांतील सुलभ शौचालयात कमालीची अस्वच्छता असून प्रवाशांना याचा नाहक मनस्ताप सहन करावा लागत आहे. रत्नागिरी मध्यवर्ती बसस्थानक व रहाटाघर स्थानकातील शौचालयाचे पाणी रस्त्यावर वाहत आहे. त्यामुळे आगारातील स्वच्छता मोहिमेला हरताळ फासला जात आहे. सर्वच आगारांतील सुलभ शौचालयांतील अस्वच्छतेबाबत एस. टी.च्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी जरा गांभीर्याने विचार करावा, अशी मागणी होत आहे रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर, लांजा, रत्नागिरी, संगमेश्वर, देवरूख, खेड दापोली येतंय मागणी होत आहे.