30.5 C
Ratnagiri
Sunday, April 21, 2024

लोकसभेत लीड दिले, तरच विधानसभेची उमेदवारी – भाजपची भूमिका

लोकसभा निवडणुकीसाठी महायुतीने दिलेल्या 'उमेदवारांना विद्यमान आमदारांनी...

रत्नागिरी मांडवी किनारी महाकाय मृत व्हेल मासा

शहरातील मांडवी समुद्रकिनारी महाकाय व्हेल मासा मृतावस्थेत...
HomeKokanगणपतीपुळ्यात सलग चौथ्या दिवशी लाटांचे तांडव

गणपतीपुळ्यात सलग चौथ्या दिवशी लाटांचे तांडव

राज्यात सर्वप्रथम मान्सून रत्नागिरीत दाखल झाल्याची घोषणा हवामान विभागाने केली असताना आणि त्याच्या जोडीलाच बिपरजॉय चक्रीवादळाचा कोकण किनारपट्टीला असलेला धोका टळल्याचे सांगितले जात असताना समुद्र मात्र बेफाट खवळला आहे. समुद्रातून उंचच उंच अशा महाकाय लाटा किनारपट्टीवर आदळत असून समुद्राचे हे दर्शन भीती निर्माण करणारे आहे. रत्नागिरीनजीकच्या गणपतीपुळे या तीर्थक्षेत्राला तर गेले ४ दिवस समुद्रातून उसळणाऱ्या लाटांनी चांगलाच तडाखा दिला आहे. रविवारी सायंकाळी समुद्रातून उसळलेल्या लाटांचे पाणी किनाऱ्यावरील काही दुकानांमध्ये शिरल्याने नुकसान झाले आहे. गणपतीपुळ्याला आलेल्या शेकडो पर्यटकांनादेखील या लाटांचा मोठा तडाखा बसला असून किमान १५ जण जखमी झाले आहेत. अनेक महिला पर्यटकांच्या पर्स आणि मोबाईल फोन समुद्राने गिळंकृत केले आहेत.

समुद्रात उसळणाऱ्या अजस्त्र लाटांनी तीर्थक्षेत्र गणपतीपुळे किनारपट्टीवर सलग चौथ्या दिवशी धुडगूस घातला आहे. समुद्र खवळला असून उसळी घेणाऱ्या अजस्त्र लाटा आणि पाण्याची वाढलेली पातळी यामुळे समुद्राचे पाणी संरक्षक भिंत पार करून मोरया चौकात घुसल्याने अनेक दुकानांचे नुकसान झाले आहे.

घोंगावणारा वारा आणि लाटा रत्नागिरीत समुद्राचे थैमान सध्या पाहायला मिळत आहे. उसळी घेणाऱ्या लाटांचे तांडव सध्या सुरु असून त्याचा फटका गणपतीपुळे किनारपट्टीला मोठ्याप्रमाणात बसला आहे. सलग चार दिवस महाभयंकर लाटांचे थैमान गणपतीपुळे समुद्र किनारी पाहायला मिळाले. रविवारी सर्वाधिक उंचीच्या लाटा गणपतीपुळे समुद्र किनारी उसळल्या होत्या. घोगावणारा वारा आणि उसळी घेणाऱ्या लाटांनी किनारपट्टीला चांगलेच झोडपून काढले आहे.

मोरया चौकात लाट रविवारी सायंकाळी ५.३० वा. च्या दरम्यान एक अजस्त्र लाट गणपतीपुळे समुद्र चौपाटीवर बांधण्यात आलेल्या संरक्षण भिंतीवरून गणपतीपुळे मोरया चौक ते रेस्ट हाऊस रस्त्यावर जोराने धडकली. त्यामुळे येथील दुकानदारांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे तर समुद्र चौपाटीवरील दुकानांची मोठ्याप्रमाणात वाताहत होऊन दुकानातील साहित्य वाहून गेले. अचानक लाटा उसळल्याने दुकानदारांना आपल्या दुकानातील साहित्य वाचविण्यासाठी वेळ मिळाला नाही.

पर्यटकांना फटका रविवारचा दिवस दुकानदारांसाठी त्रासदायक ठरला. उसळी घेणाऱ्या अजस्त्र लाटा पाहण्यासाठी आलेल्या पर्यटकांना देखील त्याचा फटका बसला आहे. अजस्त्र आलेले लाटेने अनेक महिला पर्यटकांच्या पर्स वाहून गेल्या तर अनेकांचे मोबाईलसुद्धा त्या पाण्याने गिळंकृत केले. या लाटेच्या तडाख्याने सुमारे सुमारे १० ते १५ जण जखमी झाले असून त्यांना औषध उपचारांसाठी मालगुंड प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले. याबाबतची माहिती मिळतात जयगड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक जयदीप खळेकर यांच्या मार्गदर्शनाखाली गणपतीपुळे पोलीस ठाण्याचे पोलीस सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप साळवी पोलीस कॉन्स्टेबल कुणाल चव्हाण तसेच रत्नागिरी येथून बंदोबस्तासाठी आलेल्या महिला पोलीस कर्मचारी यांनी पर्यटकांना समुद्राच्या बाहेर काढले.

पोलिसांना साथ देण्यासाठी गणपतीपुळे ग्रामपंचायतं तसेच सुरक्षारक्षक तसेच गणपतीपुळे संस्थांचे सुरक्षारक्षक व स्थानिक ग्रामस्थ यांनी मदतीसाठी धाव घेतली. चौपाटीवरील लाटेचा जोरदार तडाखा बसला आहे. अनेकांचे स्टॉल उद्ध्वस्त झाले असून या अजस्त्र लाटेबरोबरच नारळ पाणी व्यवसायिकांची नारळ भेळपुरी सेंटर व अनेक व्यवसायिकांच्या सामान समुद्रामध्ये वाहून गेल्याचे गेले आहे.

व्यावसायिकाना उसळलेल्या या लाटेचा जोरदार तडाखा बसला आहे. अनेकांचे स्टॉल उद्ध्वस्त झाले असून या अजस्त्र लाटेबरोबरच नारळ पाणी व्यवसायिकांची नारळ भेळपुरी सेंटर व अनेक व्यवसायिकांच्या सामान समुद्रामध्ये वाहून गेल्याचे गेले आहे.

RELATED ARTICLES

Most Popular