26.7 C
Ratnagiri
Thursday, July 31, 2025

महावितरण कंपनीच्या हलगर्जीपणानेच दोघांचा मृत्यू

तालुक्यातील निवळी शिंदेवाडीकडे जाणाऱ्या पायवाटेवर महावितरणच्या हलगर्जीपणामुळे...

वकिल असल्याचे सांगून लांज्यात एकाला घातला गंडा

वकील असल्याचे सांगून आसगे मांडवकरवाडी येथील एका...

कुंभार्ली घाटाची अकरा कोटी खर्चुनही दुरवस्थाच…

कुंभार्ली घाटरस्त्याच्या दुरुस्तीसाठी मागील दोन वर्षांत ११...
HomeChiplunवाशिष्ठी किनारी संरक्षक भिंत नलावडे बंधारा सज्ज

वाशिष्ठी किनारी संरक्षक भिंत नलावडे बंधारा सज्ज

वाशिष्ठी किनारी २७५ मीटर लांबी व १२ मीटर उंचीची ही भिंत आहे.

दरवर्षी पावसाळ्यात शहराला महापूर व अतिवृष्टीत दुथडी भरून वाहणाऱ्या वाशिष्ठी नदीच्या प्रवाहाला रोखण्यासाठी विविध उपाययोजना केल्या जात आहेत. त्याचाच एक भाग म्हणून गाळ उपशासह नलावडे बंधारा उभारण्यात आला असून, अपेक्षित मुदतीच्या पंधरा दिवस आधीच व अवघ्या सहा महिन्याच्या कालावधीत हे काम पूर्ण झाले आहे. वाशिष्ठी किनारी २७५ मीटर लांबी व १२ मीटर उंचीची ही भिंत आहे. वाशिष्ठी व शिवनदीच्या काठावर चिपळूण शहर वसले आहे. त्यामुळे पावसाळ्यात अतिवृष्टीवेळी दरवर्षी येथे महापूर किंवा पूरसदृश स्थिती निर्माण होते. या परिस्थितीवर नियंत्रण आणण्यासाठी विविध उपाययोजना केल्या जात आहेत. सलग दोन वर्षे गाळ उपसा केला जात आहे त्याशिवाय शहरात पूररेषेच्या आत बांधकामांवर नियंत्रित आणले आहे. त्यानंतर आता पुराची तीव्रता कमी करण्यासाठी नलावडे बंधारा उभारण्यात आला आहे. हा बंधारा चिपळूणच्या महापुरावर नियंत्रण आणण्यासाठी कायमस्वरूपी उपाययोजना म्हणून तितकाच फायदेशीर ठरणार आहे.

शहरामध्ये शंकरवाडी-मुरादपूर या दोन वाड्यांमध्ये कमी उंचीचा सखल भाग आहे. या नदीच्या वळणावर संरक्षक भिंतीचे (नलावडे बंधारा) जुने दगडी बांधकाम पूर्ण केलेले होते; परंतु २००५च्या पुरामुळे बंधाऱ्याचे बांधकाम वाहून गेले. त्यामुळे आजूबाजूच्या परिसरात पुराचे पाणी शिरून वित्तहानी होत आहे. २०२१च्या महापुरातही मोठा फटका या भागासह शहराला बसला. यामुळे या ठिकाणी पूरसंरक्षक भिंत उभारली जावी, अशी मागणी चिपळूण बचाव समितीसह स्थानिक नागरिक व लोकप्रतिनिधी यांच्याकडून सातत्याने होत होती. त्या मागणीची दखल घेत आमदार शेखर निकम यांनी पावसाळ्यापूर्वी येथील संरक्षक भिंत उभारणीसाठी २० कोटी २१ लाख १९ हजार ३०० रुपयांचा निधी मंजूर करून आणला आहे. हे काम सहा महिन्यांत पूर्ण केले.

RELATED ARTICLES

Most Popular