26.4 C
Ratnagiri
Tuesday, June 24, 2025

रत्नागिरी नगरपरिषदेत सत्ता मिळविण्यासाठी राजकीय डावपेच…

रत्नागिरी नगर परिषद निवडणूकीचे मतलई वारे आता...

विद्यार्थ्याच्या मृत्यूप्रकरणी डॉक्टरच्या चौकशीचे आदेश…

खेड तालुक्यातील तळे कासारवाडी येथे नुकत्याच दहावी...

चिपळूण-कऱ्हाड मार्ग अवजड वाहनांसाठी बंदच…

कोयना ते पाटणदरम्यानच्या पुलाचे बांधकाम सुरू असताना...
HomeRatnagiriमहामार्गावर १६ धोकादायक ठिकाणी उपाय करा

महामार्गावर १६ धोकादायक ठिकाणी उपाय करा

बावनदी येथील रस्त्याचे डायव्हर्जन व सर्व्हिस रोड अपूर्ण आहे.

महामार्ग वाहतूक पोलिस यांनी दिलेल्या माहितीनुसार, मुंबई-गोवा महामार्गावर संगमेश्वर पूल व शास्त्रीपूल येथे दरड कोसळण्याची शक्यता आहे. तिथे सुरक्षित उपाययोजनांची आवश्यकता आहे. याच महामार्गावर संगमेश्वर ते बावनदीदरम्यान रस्त्याची बाजूपट्टी धोकादायक झाली आहे. त्या भागात रस्त्याला मोठे खड्डे पडले आहेत. त्यामुळे अपघात वाढले आहेत. बावनदी येथील रस्त्याचे डायव्हर्जन व सर्व्हिस रोड अपूर्ण आहे. निवळी घाटामध्ये दिशादर्शक फलक, कॅटआय, बाजूपट्टीला रेडियम लावलेले नाही तसेच वाहनांना वेग नियंत्रित करण्यासाठी उपाययोजना करणे गरजेचे आहे. महामार्गाच्या बाजूला संरक्षण भिंतीची आवश्यकता आहे. घाटामध्ये दरड कोसळून अपघाताची शक्यता असल्याने तिथे आवश्यक मशिनरी सज्ज ठेवावी लागणार आहे. पाली बाजारपेठ, हातखंबा गाव, लांजा शहर, कुवे येथील खड्डे पडलेले सेवारस्ते पूर्ण करण्याची गरज आहे.

महामार्गावरील या मुख्य बाजारपेठा असल्याने तिथे वाहतूककोंडी झाल्यास पर्यायी मागनि वाहतूक वळवण्यासाठी आणि ते मार्गही सुस्थितीत ठेवण्याची आवश्यकता आहे. महामार्गांवर दरड कोसळण्याची शक्यता असलेली ४ ठिकाणी, २ ठिकाणच्या बाजूपट्टी धोकादायक, चार प्रमुख बाजारपेठेतील सेवारस्त्यांची दुरवस्था, घाटातील ३ ठिकाणी उपाययोजना आवश्यक आहेत. मार्गदर्शक फलक, कॅटआय, सफेद पट्टे असलेली तीन ठिकाणे असून, २ ठिकाणी संरक्षक भिंत बांधणे आवश्यक आहे. मिऱ्या-नागपूर आणि मुंबई-गोवा महामार्गांवर पाली हे जंक्शन आहे. तिथे दिशादर्शक फलक आणि बॅरिकेड्स नसल्याने वाहनधारक विरुद्ध बाजूने येतात. अवजड वाहन असेल तर अनेकवेळा वाहतूककोंडी किंवा अपघात घडत आहेत. त्यामुळे तेथे तातडीने

उपाययोजना करणे गरजेचे आहे. वेरळ घाटात जोडरस्त्याचे डांबरीकरण करणे गरजेचे आहे. घाटात वेगमर्यादा फलक, ब्लिंकर, रेडियम लावणे गरजेचे आहे. हातखंबा गावातील दर्याजवळ माती रस्त्यावर येण्याची शक्यता असल्याने तेथे योग्य त्या उपाययोजना कराव्यात, अशा सूचना महामार्ग विभागाला वाहतूक पोलिसांकडून केल्या आहेत. निवळीजवळ महामार्गाच्या पुलाच्या एका बाजूस सेवारस्ता करणे आवश्यक आहे. मिऱ्या-नागपूर महामार्गावर आंबाघाटात दख्खन ते घाटातील गणपती मंदिरापर्यंत रस्त्याचे काम सुरू असल्याने सुरक्षेवर लक्ष ठेवले पाहिजे. साखरपा येथे सेवारस्ता करणे आणि दाभोळे घाटात काम अपूर्ण असल्याने तेथे दरड कोसळण्याची शक्यता आहे. तेथे दुर्घटना घडू नयेत म्हणून योग्य त्या उपाययोजना करण्याची आवश्यकता आहे.

RELATED ARTICLES

Most Popular