29.1 C
Ratnagiri
Sunday, February 25, 2024

बहुजनांनी ओबीसी झेंड्याखाली एकत्र यावे – चंद्रकांत बावकर

कुणबी समाजासह ओबीसी समाजाच्या विकासासाठी संघटन होण्यासह...

सहा शेतकऱ्यांना राज्यस्तरीय कृषी पुरस्कार

कृषी, कृषी संलग्न क्षेत्र फलोत्पादन क्षेत्रात उल्लेखनीय...

रत्नागिरी ‘लायन्स क्लब’च्या डायलिसिस सेंटरचा प्रारंभ

लायन्स चॅरिटेबल ट्रस्ट संचालित यशस्वी नेत्र रुग्णालयानंतर...
HomeRatnagiriजि.प.च्या १६१ प्राथमिक शाळा शुन्य शिक्षकी मुलांना शाळेत न पाठवण्याचा पालकांचा निर्णय

जि.प.च्या १६१ प्राथमिक शाळा शुन्य शिक्षकी मुलांना शाळेत न पाठवण्याचा पालकांचा निर्णय

सुमारे ७७५ प्राथमिक शिक्षकांच्या जिल्ह्याबाहेर बदल्या झाल्याने जिल्हा परिषदेच्या १६१ प्राथमिक शाळा शुन्य शिक्षकी झाल्या आहेत. गुरुवार दि. १५ जूनपासून नवीन शैक्षणिक वर्षाला सुरूवात झाली आहे. शिक्षक नसल्याने विद्यार्थ्यांना शाळेतच न पाठवण्याचा निर्णय पालकांनी घेतला आहे. शुन्य शिक्षकी शाळांची संख्या अनपेक्षितरीत्या वाढल्याने असंख्य विद्यार्थ्यांचे शैक्षणिक भवितव्य अंधारमय झाले आहे. या संदर्भात जिल्हा परिषद प्रशासन चिंताग्रस्त झाले असून विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक भवितव्याबाबत कोणता निर्णय घेतात याकडे पालकांचे लक्ष लागले आहे.

प्राथमिक शिक्षकांच्या घाऊक प्रमाणात जिल्ह्याबाहेर बदल्या केल्याने शुन्य शिक्षकी शाळांची संख्या वाढली आहे. अनेक शाळांमध्ये फक्त एकच शिक्षक शिल्लक राहिला आहे. एकाच शिक्षकाने सात वर्गात कसे शिकवायचे? असा गंभीर प्रश्न या निमित्ताने निर्माण झाला आहे. मंडणगड तालुक्यात शिक्षकांची ४२० पदे मंजूर असून ९६ पदे रिक्त आहेत. जिल्हा बदलीने ६० शिक्षकांना सोडण्यात आल्याने ८ शाळा शुन्य शिक्षकी झाल्या आहेत. दापोली तालुक्यात शिक्षकांची ८०५ पदे मंजूर असून २५३ पदे रिक्त आहेत. जिल्हा बदलीने ८७ शिक्षकांना सोडल्याने २२ शाळा शुन्य शिक्षकी झाल्या आहेत. खेड तालुक्यात शिक्षकांची ९६१ पदे मंजूर असून २२८ पदे रिक्त आहेत. जिल्हा बदलीने ९३ शिक्षकांना सोडल्याने शुन्य शिक्षकी शाळांची संख्या २० इतकी झाली आहे.

गुहागर तालुक्यात शिक्षकांची ६०७ पदे मंजूर असून १९९ पदे रिक्त आहेत. ७९ शिक्षकांना जिल्हा बदलीने सोडण्यात आल्याने शुन्य शिक्षकी शाळांची संख्या १७ इतकी आहे. चिपळूण तालुक्यात १००१ शिक्षकांची पदे मंजूर असून १४१ पदे रिक्त आहेत. जिल्हा बदलीने ७० शिक्षकांना सोडण्यात आल्याने शुन्य शिक्षकी शाळांची संख्या ८ इतकी झाली आहे. संगमेश्वर तालुक्यात शिक्षकांची १०१५ पदे मंजूर असून २८७ पदे रिक्त आहेत. जिल्हा बदलीने ९९ शिक्षकांना सोडण्यात आल्याने शुन्य शिक्षकी शाळांची संख्या २८ झाली आहे. रत्नागिरी तालुक्यात १००१ शिक्षकांची पदे मंजूर असून त्यापैकी १३६ पदे रिक्त आहेत. जिल्हा बदलीने ६५ शिक्षकांना सोडण्यात आल्याने शुन्य शिक्षकी शाळांची संख्या १४ इतकी आहे.

लांजा तालुक्यात शिक्षकांची ६३२ पदे मंजूर असून १६१ पदे रिक्त आहेत. जिल्हा बदलीने ६० शिक्षकांना सोडण्यात आल्याने शुन्य शिक्षकी शाळांची संख्या २३ इतकी झाली आहे. राजापूर तालुक्यात ९५४ शिक्षकांची पदे मंजूर असून २५१ पदे रिक्त आहेत. जिल्हा बदलीने १२१ शिक्षकांना सोडण्यात आल्याने शुन्य शिक्षकी शाळांची संख्या २१ इतकी झाली आहे. संबंधित गावांमधील शाळा नाईलाजाने बंद कराव्या लागणार आहेत. अथवा अन्य शिक्षकांना अशा शाळांवर कामगिरीवर पाठविण्याचा पर्याय जिल्हा परिषदेसमोर उपलब्ध आहेत. नेमक्या किती शिक्षकांची कार्यमुक्तीवर जिल्हा परिषद नियुक्ती करते याकडे पालक, लोकप्रतिनिधी, ग्रामस्थ आदींचे लक्ष लागले आहे.

RELATED ARTICLES

Most Popular