26.1 C
Ratnagiri
Saturday, September 6, 2025

जिल्ह्यात सहा लाखांचा अवैध मद्य साठा जप्त…

राज्य उत्पादन शुल्क निरीक्षक रत्नागिरी विभाग व...

प्रशासनाकडून विसर्जनाची तयारी पूर्ण, बंदोबस्त तैनात

अनंत चतुर्दशीला लाडक्या गणरायाला निरोप देत जड...

राजापूर प्रारूप प्रभाग रचनेवर ८३ हरकती

गेल्या तीन वर्षांपासून रखडलेल्या नगर पालिका निवडणुकीचे...
HomeEntertainmentभुताचा भास झाला आणि बोबडीच वळली – अभिनेता विराजस

भुताचा भास झाला आणि बोबडीच वळली – अभिनेता विराजस

हा अनुभव विराजसने त्याच्या इन्स्टा पेजवर व्हिडियोच्या माध्यमातून शेअर केला आहे

खरच भूत, आत्मा असतात का? या संकल्पनेचा विचार जरी केला तरी अंगावर काटा येतो. पण सध्या भूत या संकल्पनेवर बेतलेल्या गोष्टी सिनेमा, मालिकांमधून दाखवण्यासाठी अनेक जण तयार आहेत. मालिका आणि सिनेमामध्ये दाखविण्यात येणारे प्रसंग बनविलेले असतात. पण एखाद्या वेळेस रात्रीच्या वेळेस असे कोणी समोर दिसले तर !

असाच काहीसा भुताचा भास झाल्याचा अनुभव अभिनेता विराजस कुलकर्णी याला पुण्यातील एका रस्त्यावर भर मध्यरात्री आला. मित्रा बरोबर रात्री घरी जात असताना अचानक बाईकच्या समोरून सफेद धोतर, शर्ट, गांधी टोपी अशा वेशभूषेतील एक व्यक्ती दिसल्याने त्याच्या मित्राने बाइकचा ब्रेक करकचून दाबला आणि नेमक त्याच वेळी विराजसला सुद्धा तशीच व्यक्ती दिसल्याने, त्याने मित्राचा खांदा एकदम घट्ट आवळला. पण ती व्यक्ती काही क्षणामध्येच दिसेनाशी झाली. त्यामुळे नक्की हा भास कि खरच कोणी होत याबद्दल शंका निर्माण झाली.

हा अनुभव विराजसने त्याच्या इन्स्टा पेजवर व्हिडियोच्या माध्यमातून शेअर केला आहे. तो पुढे लिहितो, मी ही गोष्ट माझ्या मित्राला सांगावी की नको या विचारात असतानाच मित्र म्हणाला,  की सॉरी रे असा अचानक ब्रेक मारल्याबददल. पण मला एक पांढरे धोतर, शर्ट आणि टोपी घातलेले आजोबा पटकन बाइकसमोर आल्याचे दिसले. आता हा भास असेल की खरंच कुणी व्यक्ती आली आणि गेली ते कळलंच नाही. मित्राचं ते बोलणं ऐकून मी चांगलाच घाबरलेलो. मी मित्राला लगेच सांगितल कि, इथे अजिबात कुठेही न थांबता सरळ गाडी चालव. थोड्या वेळात आम्ही आपापल्या घरी पोहोचलो. परंतु भुताचा भास झाला आणि माझी बोबडीच वळली. अनेकांनी त्याच्या पोस्ट वर कमेंट केल्या आहेत.

विराजस सोशल मीडियावर कायम अ‍ॅक्टिव्ह असतो. ऑफस्क्रीन धमाल मस्तीसोबत विराजस त्याच्या जादूच्या पोस्ट देखील शेअर करत असतो. त्याच्या जादूच्या प्रयोगांना कायमच दाद मिळते. मात्र मध्यरात्री त्याने अनुभवलेला हा प्रसंग कोणतीही जादू नसून तो नक्की भास होता की सत्य हे मात्र अजूनही विराजसला कळलेलं नाही.

RELATED ARTICLES

Most Popular