25.6 C
Ratnagiri
Monday, September 16, 2024
HomeRatnagiriलाडकी बहिण योजना बंद होणार नाही तर हा माहेरचा आहेर वाढेल :...

लाडकी बहिण योजना बंद होणार नाही तर हा माहेरचा आहेर वाढेल : मुख्यमंत्री शिंदे

रत्नागिरी येथील 'मुख्यमंत्री लाडकी बहिण योजनेच्या' वचनपुर्ती सोहळ्या प्रसंगी बोलत होते.

मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना ही मायभगिनींसाठी सुरु केलेली प्रामाणिक भावनेने योजना असून कोणीही कितीही गैरसमज पसरविले तरी ती बंद होणार नाही. हा माहेचा आहेर असून तो वाढेल असे प्रतिपादन राज्याचे मुख्यमंत्री ना. एकनाथ शिंदे यांनी येथे केले. आम्ही दिलेला शब्द पाळतो. ‘ही लेना बैंक नसून देना बैंक आहे’ अशा शब्दांत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विरोधी पक्षाला फटकारले, ते रत्नागिरी येथील ‘मुख्यमंत्री लाडकी बहिण योजनेच्या’ वचनपुर्ती सोहळ्याप्रसंगी बोलत होते. बुधवारी रत्नागिरीत ‘मुख्यमंत्री लाडकी बहिण वचनपुर्ती सोहळा’ सुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत संपन्न झाल्ला.

या सोहळाला महिला बालकल्याण मंत्री ना. आदिती तटकरे, रत्नागिरीचे पालकमंत्री ना. उदय सामंत, आ. शेखर निकम, आ.रविंद्र फाटक, माजी आम दार सदानंद चव्हाण, सिंधुरत्न योजनेचे संचालक किरण सामंत यांच्यासह कोकण रेंजुचे आयजी संजय दराडे, जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंग, पोलीस अधिक्षक धनंजय कुलकर्णी, मुख्य कार्यकारी अधिकारी किर्तीकुमार पुजार आदी उपस्थित होते. यावेळी बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महाविकास आघाडीवर जोरदार टीकास सोडले.

हा चुनावी जुमला नाही – यावेळी बोलताना ते म्हणाले की, लाडकी बहीण योजनेवरुन विरोधकांनी टीका केली, त्यांना पोटशूळ उठला आहे. ही योजना म्हणजे चुनावी जुमला, असे आरोप केले. योजना बंद पडेल, अशी भाकिते केली जात आहेत, मात्र कोणीही मायचा लाल आला तरी ही योजना बंद पडणार नाही, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठणकावून सांगितले.

माहेरचा आहेर वाढवणार या – योजनेसाठी ३३ हजार कोटींची तरतूद राज्य शासनाने केली आहे. तुमचा भाऊ माहेरचा आहेर वाढवणार आहे. मला माझ्या भगिनी लखपती झाल्याचे पहायचेय. आमची लेना बँक नसून देना बँक असल्याचे सांगून त्यांनी विरोधकांवर टीका केली.

आम्ही दिलेला शब्द पाळतो – आम्ही दिलेला शब्द पाळतो, असे सांगत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पुढे म्हणाले की, तुमचा सख्खा भाऊ कोण आणि सावत्र भाऊ कोण हे तुम्हाला कळंलं असेल. ही योजना लागू होताच अनेकांना मळमळ होऊ लागली, काहींना उलट्या होऊ लागल्या. म्हणून काहीजण कोर्टात गेले, मात्र कोर्टानेही त्यांना फटकारलं. हे पैसे मिळू नयेत म्हणून काहीजण विरोधात होते आणि. आता विरोधकच या योजनेचा बोर्ड लावतायत आणि श्रेय घेतायत, अशी टीका त्यांनी केली.

तुफान गर्दी – या कार्यक्रमासाठी प्रशासनाने केलेले नियोजन फळाला आले. मोठ्या प्रमाणात महिलांची गर्दी कार्यक्रमाला झाली होती. एसटीच्या बसेस जिल्ह्यातून भरून येत होत्या. जणू काही महिलांचे महासंमेलनच आहे, अशा पद्धतीने सभामंडप भरून गेले होते.

RELATED ARTICLES

Most Popular