22.2 C
Ratnagiri
Saturday, January 24, 2026

उपनगराध्यक्ष-अभियंता यांच्यात खडाजंगी रत्नागिरी नगरपालिका

रत्नागिरी नगरपालिकेच्या आवारात आज सायंकाळी उपनगराध्यक्ष समीर...

शहरातील अतिक्रमणांवर आज हातोडा रत्नागिरी पालिका आक्रमक

शहरातील अतिक्रमणाविरोधात पालिका आक्रमक झाली आहे. यातून...

दापोलीत ठाकरेंच्या उमेदवाराचा अर्ज अवैध

पंचायत समिती व जिल्हा परिषद निवडणुकीसाठी सुरू...
HomeKhedस्वप्नात दिसलेला मृतदेह कोणाचा? शोध सुरुच जबाबात विसंगतीमुळे बनाव असल्याचा कयास

स्वप्नात दिसलेला मृतदेह कोणाचा? शोध सुरुच जबाबात विसंगतीमुळे बनाव असल्याचा कयास

प्रेमात पडलेल्या या तरूणाने आपल्या प्रेयसीवर इंप्रेशन मारण्यासाठी हा प्रकार केला असावा अशी चर्चा सुरु आहे.

सावंतवाडीतील एका तरूणाला स्वप्नात रत्नागिरी जिल्ह्यातील भोस्ते घाटातील मृतदेह दिसत असल्याने खळबळ उडाली होती. स्वप्नात वारंवार तो दिसत असल्याने त्या तरूणाने थेट खेड गाठले. पोलीसांना खबर दिली आणि पोलीसांनी शोध घेतला असता एक मृतदेह सापडला देखील. मात्र पुढील तपासात हा सारा बनाव असल्याचे पुढे आले असून तरूणाने सांगितलेला घटनाक्रम आणि प्रत्यक्ष वस्तूस्थिती यांच्यामध्ये तफावत आढळत आहे. दरम्यान पोलीस अजूनही या प्रकरणाचा कसून तपास करत आहेत. मात्र हा बनाव असल्याचा संशय बळावत असल्याने संबंधित तरूणाची मानसोपचार तज्ञांकडून तपासणी करण्यात येणार आहे. या प्रकरणाच्या तपासासाठी पोलीसांची ४ स्वतंत्र पथके काम करत असल्याचे वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी पत्रकारांना माहिती देतांना सांगितले.

स्वप्नात दिसला मृतदेह – पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, आजगाव सावंतवाडी येथे राहणाऱ्या योगेश पिंपळ आर्य या ३० वर्षीय तरूणाला भोस्ते घाटातील डोंगरात असलेला एक मृतदेह स्वप्नात दिसत होता. वारंवार हे स्वप्न पडू लागल्याने या तरूणाने थेट खेड गाठले आणि पोलीसांना कल्पना दिली. पोलीसांनी एफआयआर नोंदवून घेतला. पोलीसांनी तपास केला असता एक छिंन्न विछिन्न मृतदेह आढळला देखील. त्यामुळे सुरुवातीला पोलीस देखील चक्रावले. अधिक चौकशी आणि तपास सुरु झाला. या तरूणानेच इन्ट्राग्रामवर काही व्हिडिओ शेअर केले होते. त्याची देखील पोलीसांनी बारकाईने पहाणी केली. आर्यकडे चौकशी केली. स्वप्नाविषयी सविस्तर माहिती घेतली. मात्र तो जी हकीकत सांगत होता त्यामध्ये काही ना काही तफावत आढळत होते.

प्रकार बोगस? – या तरूणाच्या जबावामध्ये वारंवार तफावत आढळत असल्याने हा प्रकार बोगस असल्याची शंका व्यक्त होत आहे. मात्र पोलीसांनी ही शक्यता असली तरी तपास थांबविलेला नाही. या तरूणाच्या चौकशीसोबतच मृतदेहाची ओळख पटवण्याचा प्रयत्न सुरु आहे. योगेश आर्य याची मानसोपचार तज्ञाकडून तपासणी केली जाणार आहे. प्रेमात पडलेल्या या तरूणाने आपल्या प्रेयसीवर इंप्रेशन मारण्यासाठी हा प्रकार केला असावा अशी चर्चा सुरु आहे. पोलीसांनी त्याअनुशंगाने देखील तपास सुरु केला आहे. मात्र याबाबत अधिक भाष्य करणे पोलीसांनी टाळले आहे.

RELATED ARTICLES

Most Popular