25.2 C
Ratnagiri
Thursday, October 10, 2024

राजापुरात तीन गावांमध्ये वीज पडून नुकसान

ढगांच्या गडगडाटासह रत्नागिरी, राजापूर तालुक्यात परतीच्या पावसाने...

कोकणातील १५ जागा महायुती जिंकेल – मंत्री उदय सामंत

आगामी विधानसभेसाठी रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिह्यातल्या किती...

सात औद्योगिक संस्थांना नवी ओळख…

कॅबिनेट मंत्री मंगल प्रभात लोढा यांच्या पुढाकारामुळे...
HomeRatnagiriविनाअनुदानित शाळांना वाढीव टप्पा मिळावा यासाठी नक्कीच प्रयत्न करुः नाम. उदय सामंत

विनाअनुदानित शाळांना वाढीव टप्पा मिळावा यासाठी नक्कीच प्रयत्न करुः नाम. उदय सामंत

विनाअनुदानित शाळांच्या विविध समस्या बाबत निवेदन देण्यात आले.

विनाअनुदानित शाळांना वाढीव टप्पा मिळावा तसेच त्यांचे इतर शैक्षणिक प्रश्न सोडविण्यासाठी शासन दरबारी नक्कीच प्रयत्न करणार असून येत्या कॅबिनेट मध्ये वाढीव टप्पा अनुदान मिळवून देण्यासाठी या राज्याचा जबाबदार मंत्री म्हणून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्याकडे पाठपुरावा करणार असल्याचे आश्वासन राज्याचे उद्योगमंत्री तथा रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांनी लांजा येथे दिले. रत्नागिरी जिल्हा विनाअनुदानित शाळा कृती समितीच्या वतीने उद्योगमंत्री उदय सामंत यांची लांजा येथील कार्यक्रम ात भेट घेवून विनाअनुदानित शाळांच्या विविध समस्या बाबत निवेदन देण्यात आले.

यावेळी वरील आश्वासन मंत्री उदय सामंत यांनी दिले. यावेळी विनाअनुदान शाळा कृती समितीचे अध्यक्ष मोरेश्वर लिंगायत, लांजा तालुका माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष संदेश कांबळे, सचिव प्रकाश हरचेकर, कृती समितीचे कुणाल कदम आदी शेकडो शिक्षक व कर्मचारी उपस्थित होते. विनाअनुदानित शाळांमधील शिक्षक व कर्मचारी यांना गेली अनेक वर्ष तुटपुंजा पगार मिळतोय. १२ जुलैला सरकारने अंशतः अनुदानित शाळांसाठी वाढीव टप्पा अनुदान जाहीर केले होते. पण या निर्णयाची अंमलबजावणी झाली नसल्याने या शिक्षकांनी आंदोलन तीव्र केले आहे.

संपूर्ण महाराष्ट्रात या आंदोलक शिक्षकांची संख्या जवळपास ६७ हजार इतकी आहे. हक्काचे अनुदान मिळत नसल्याने हे सगळे शिक्षक बेमुदत आंदोलनासाठी मुंबई आझाद मैदान व कोल्हापूर येथील उपसंचालक कार्यालय येथे बसले आहेत. गेल्या ५० दिवसांपैकी ११ दिवस विनाअनुदानित शिक्षकांनी शिक्षण उपसंचालक कोल्हापूर कार्यालयासमोर आमरण उपोषण केले आहे. जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा, रस्ता रोको, तसेच अनेक आंदोलने करून शासनाचे लक्ष वेधले आहे. ‘मुख्यमंत्री शिक्षणमंत्री यांनीही वाढीव टप्प्याचा जीआर कॅबिनेट बैठकीत काढतो असे सर्वांना सांगितले आहे. परंतु कैबिनेट बैठकच लांबत असल्याने हे शिक्षक संतप्त झाले आहेत.

RELATED ARTICLES

Most Popular