25.6 C
Ratnagiri
Sunday, August 31, 2025

शिंदेंच्या मंत्र्यांवर लक्ष ठेवण्यासाठी अधिकारी…

राज्यात महायुती असली तरीही भाजपकडून कुरघोडींचे राजकारण...

पेढांबेतील पूल दुरुस्तीच्या प्रतीक्षेत, अवजड वाहतूक बंद

दुरुस्तीअभावी धोकादायक झालेला पेढांबे येथील जुन्या पुलावरून...

जनआरोग्य योजनेतील कार्ड बनवा : एम. देवेंदर सिंह

एकत्रित आयुष्मान भारत प्रधानमंत्री जनआरोग्य योजना, महात्मा...
HomeRajapurखा. नारायण राणे आज राजापुरात पूर परिस्थितीची करणार पहाणी

खा. नारायण राणे आज राजापुरात पूर परिस्थितीची करणार पहाणी

पूर परिस्थितीची पहाणी करून प्रशासनाकडून माहिती घेणार आहेत.

माजी केंद्रीय मंत्री, खासदार नारायण राणे मंगळवारी राजापूर दौऱ्यावर येत आहेत. यावेळी ते राजापूर शहरातील पुर परिस्थितीची पहाणी करणार आहेत. त्यानंतर ते राजापुरातील भाजपा पदाधिकारी व कार्यकर्त्याशी संवाद साधणार आहेत. अशी माहिती भाजपा पुर्व मंडळ तालुका अध्यक्ष भास्कर सुतार व पश्चिम मंडळ तालुका अध्यक्ष सुरेश गुरव यांनी दिली आहे. मंगळवारी दुपारी ३.३० वाजता खासदार नारायण राणे राजापुरात दाखल होणार आहेत.

यानंतर ते राजापूर शहरात रविवारी निर्माण झालेल्या पूर परिस्थितीची पहाणी करून प्रशासनाकडून माहिती घेणार आहेत. राजापुरात रविवारी अर्जुना व कोदवली नद्यांना पुर आला होता व या पुराचे पाणी राजापूर शहर बाजारपेठेत शिरले होते. त्याची पहाणी खा. राणे करणार आहेत. यावेळी ते व्यापारी व नागरिकांशीही संवाद साधणार आहेत. तर ग्रामीण भागातही पुरामुळे ओढवलेल्या आपत्तीबाबत खा. राणे माहिती घेणार आहेत.

यानंतर राजापूर नगर वाचनालय सभागृहात खा. राणे हे भाजपा पदाधिकारी व कार्यकर्त्यांशी संवाद साधणार आहेत. खासदार म्हणून निवडून आल्यानंतर राणे प्रथमच राजापुरात येत असल्याने भाजपा पदाधिकारी व कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण असून भाजपाच्या वतीने राणे यांचे राजापुरात जंगी स्वागत करण्यात येणार आहे.

RELATED ARTICLES

Most Popular