28.3 C
Ratnagiri
Wednesday, October 9, 2024

ना. उदय सामंतांचा रत्नागिरी बाजारपेठेतील व्यापाऱ्यांनी केला अभूतपूर्व सत्कार

रत्नागिरीचे पालकमंत्री व महाराष्ट्राचे उद्योगमंत्री ना. उदय...

चिपळुणात शेतकऱ्यांचे १८०० अर्ज झाले बाद

पीएम किसान व नमो सन्मान योजनेच्या नवीन...
HomeSindhudurgमुंबई-गोवा महामार्गावर साडेतीन फूट पाणी १४ तास वाहतूक बंद

मुंबई-गोवा महामार्गावर साडेतीन फूट पाणी १४ तास वाहतूक बंद

ग्रामस्थांनी पाण्यात अडकलेल्या प्रवाशांना सुखरुप बाहेर काढले.

शनिवारी रात्रीपासून कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे कुडाळ तालुक्यात अनेक ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली असून महामार्गावर पावशी येथे साडेतीन फूट पाणी आल्याने मुंबई- गोवा महामार्गाला मोठा फटका बसला. पाण्याचा अंदाज न आल्याने पावशी येथे काही वाहन चालकांनी गाड्या पाण्यात टाकल्या, मात्र पुढे गेल्यानंतर पाणी वाढत असल्याचे लक्षात आले. दुचाकींसह एक एस.टी. बस आणि गोव्याहून आलेल्या लक्झरीचा यामध्ये समावेश होता. आवाज ऐकून पावशी येथील ग्रामस्थांनी पाण्यात अडकलेल्या प्रवाशांना सुखरुप बाहेर काढले. रात्रभर ही परिस्थित अशीच होती. रविवारी सायंकाळी ५.०० वाजता बंद झालेली वाहतूक सोमवारी सकाळी ७ वा. सुरू झाली.

सुमारे १४ तास मार्गावर पाणी असल्याने वाहतुकीला फटका बसला. दरम्यान सिंधुदुर्ग जिल्ह्यातून ४०० नागरिकांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आले असून गोव्यासह दक्षिण कोकण किनारपट्टीला पुन्हा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. ७ जून रोजी रात्रीपासून पावसाने जोर धरला. भंगसाळ नदी यापूर्वीच अर्धी भरली होती. दुपारी ४ वा. हॉटेल गुलमोहर ते कांळपनाका येथे पाणी आले. सायंकाळी ५ वा. पावशी सातेरी मंदिर समोरील महामार्गावर पाणी आले आणि वाहतूक बंद झाली. पांवणे आठ वाचता अक्कलकोट वेंगुर्ले एस.टी. बस पाण्यात बंद पडली. त्यापूर्वीच एक कार पाण्यात बंद पडली होती. तिला ढकलत ढकलत ग्रामस्थांनी बाहेर काढले.

त्यानंतर गोव्याहून मुंबईच्या दिशेने जाणारी लक्झरी बस याच पाण्यात अडकली. पुन्हा आरडा ओरड सुरू झाली आणि स्थानिक लोक धावले. रात्रभर ही परिस्थिती तरीच कायम होती. त्यामुळे रस्ताच्या बाजूला आसलेले लाकडाचे ओंडके रत्या वर आले होते. सकाळी सात वाजण्याच्या सुमारास हळू हळू वाहतूक सुरु झाली. संध्याकाळी काळी पाच वाजता बंद असलेली वाहतूक सकाळी सात वाजता सुरू झाली. एकंदरीत महामार्गावर चौदा तास वाहतूक बंद होती. आणि १४ सातच्या नंतर मुंबई महामाग पूर्ववत सुरू झाला. महामार्गावर अडकलेल्या वाहनधारकांनी सुटकेचा निश्वास टाकला.

RELATED ARTICLES

Most Popular