27.1 C
Ratnagiri
Saturday, July 27, 2024

कोकणातील मच्छीमार सहकार संस्था बंद होण्याच्या स्थितीतः आ. साळवी

रत्नागिरी जिल्हयातील मच्छीमारांच्या समस्या व मागण्यांबाबत मत्स्यव्यवसाय...

कोकण रेल्वेचे दुपदरीकरण होणार, वीर ते चिपळूण पहिला टप्पा करण्याचा निर्धार

कोकण रेल्वेचे दुपदरीकरण टप्प्याटप्यांनी करण्याचा निर्णय घेण्यात...

शेअर्स मार्केट मधून भरपूर पैसे कमावण्याचे आमिष दाखवुन फसवणूक

शेअर्स मार्केट मधून भरपूर पैसे मिळवून देण्याचे...
HomeRatnagiriरत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदारसंघाची निवडणूक कमळ चिन्हावरच लढणार, भाजपचा निर्णय

रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदारसंघाची निवडणूक कमळ चिन्हावरच लढणार, भाजपचा निर्णय

निवडणूक कमळ चिन्हावर म्हणजेच भाजपाकडून लढविली जाणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

आगामी रत्नागिरी- सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातील निवडणूक कमळ चिन्हावर लढवली जाणार असल्याची मोठी माहिती भाजपाचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष अतुल काळसेकर यांनी मंगळवारी लांजा येथील पत्रकार परिषदेत दिली. गेल्या काही दिवसांपासून रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदारसंघ शिवसेना लढवणार की भाजप याबाबत चर्चा सुरू आहे. या पार्श्वभूमीवर काळसेकर यांची ही घोषणा महत्वपूर्ण मानली जात आहे. २ महिन्यांपूर्वी लांजा येथे पार पडलेल्या शिवसेनेच्या मेळाव्यात पालकमंत्री उदय सामंत यांनी देखील ही लोकसभा निवडणूक आपले मोठे बंधू किरण सामंत हे लढविणार असून त्यांना रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या दोन्ही जिल्ह्यात लोकांचा, मतदारांचा चांगला पाठिंबा मिळत असल्याचे विधान केले होते.

या पार्श्वभूमीवर मंगळवारी लांजा येथे आलेल्या भाजपाचे प्रदेश उपाध्यक्ष अतुल काळसेकर यांना या लोकसभा निवडणुकीबाबत पत्रकारांनी विचारले असता त्यांनी सांगितले की, आमची सर्व तयारी झाली आहे आणि ही निवडणूक कमळ या चिन्हावरच लढवली जाणार असल्याचे मोठे विधान त्यांनी यावेळी केले. त्यामुळे गेल्या काही महिन्यांपासून ही निवडणूक शिवसेना लढणार की भाजप या चर्चाना पूर्णविराम मिळाला असून ही निवडणूक कमळ चिन्हावर म्हणजेच भाजपाकडून लढविली जाणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

पत्रकार परिषदेत अतुल काळसेकर यांनी सगतले की, रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातील १३५० रामसेवक ८ फेब्रुवारी रोजी आस्था या खास ट्रेनने अयोध्या दर्शनासाठी जाणार आहेत. या पत्रकार परिषदेला प्रदेश उपाध्यक्ष अतुल काळसेकर यांच्यासह लोकसभा सहप्रभारी बाळासाहेब माने, जिल्हा सरचिटणीस सतीश नलावडे, महिला मोर्चा अध्यक्षा परिणीता सावंत लांजा तालुका अध्यक्ष चंद्रकांत मांडवकर, जिल्हा उपाध्यक्ष महेश खामकर आदींसह भाजपाचे लांजा तालुक्यातील पदाधिकारी उपस्थित होते.

RELATED ARTICLES

Most Popular