24.4 C
Ratnagiri
Saturday, November 1, 2025

देशातील सरकार घटना पाळतच नाही आ. भास्कर जाधव यांची सडकून टीका

७४ व्या घटना दुरुस्तीनंतर ऑक्टो. आज देशामध्ये...

ताम्हाणी घाटात अपघात, डोंगरावरून कोसळलेली दरड डोक्यात पडून महिला ठार

माणगाव-पुणे मार्गावर ताम्हिणी घाटात माणगाव तालुक्यातील कोंडेथर...

पूररेषेतील बांधकामांना दिलासा ! नगरविकास विभागाकडून समिती

पूररेषेतील बांधकामांसाठी नगरविकास खात्याने नियम शिथिल करावेत,...
HomeRajapurवृध्द महिलेचा घरात आढळला मृतदेह घातपाताची शक्यता

वृध्द महिलेचा घरात आढळला मृतदेह घातपाताची शक्यता

पोलीस या प्रकरणाचा सर्व बाजूंनी तपास करत आहेत.

राजापूर तालुक्यातील रायपाटण येथील टक्केवाडी परिसरात एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. श्रीमती वैशाली शांताराम शेट्ये (वय ७४) या वयोवृद्ध महिलेचा मृतदेह त्यांच्या राहत्या घरी आढळला असून हा घातपाताचा प्रकार असावा, अशी शंका उपस्थित होत आहे. या घटनेची माहिती मिळताच लांजा-राजापूरचे उपविभागीय पोलीस – अधिकारी सुरेश कदम आणि राजापूरचे पोलीस निरीक्षक अमित यादव हे तातडीने घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी या प्रकरणाचा कसून तपास सुरू केला आहे. या घटनेमागे घातपाताची शक्यता व्यक्त होत आहे. तपास यंत्रणांनी श्वान पथकासह, फॉरेन्सिक टीम आणि स्थानिक गुन्हे. शाखेच्या पथकाला रायपाटणमध्ये पाचारण केले आहे. टक्केवाडीतील घरात रायपाटणमधील टक्केवाडी येथे ही घटना घडली आहे. वैशाली शेटे या घरी एकट्याच राहत होत्या.

वाडीतील ग्रामस्थांनी त्यांना अखेरचे सोमवारी १३ ऑक्टोबरला पाहिले होते. त्यानंतर त्या दिसल्या नाहीत. त्यामुळे संशय आल्याने बुधवारी १५ ऑक्टोबरला सकाळी वाडीतील एका महिलेने त्यांच्या घराचा दरवाजा ठोठावला, म ात्र आतून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. अखेरीस, त्या महिलेने धाडसाने जोर लावून दरवाजा लोटला असता, दरवाजा उघडला आणि घरातील भयानक प्रकार समोर आला. घरात श्वानपथकाला पाचारण या घटनेमुळे संपूर्ण टक्केवाडीत आणि रायपाटण परिसरात मोठी खळबळ उडाली. वाडीतील ग्रामस्थांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली आणि रायपाटण पोलीस दूरक्षेत्राला या घटनेची माहिती दिली. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस तात्काळ दाखल झाले.

त्यानंतर वरिष्ठांना माहिती मिळताच लांजा-राजापूरचे उपविभागीय पोलीस अधिकारी सुरेश कदम आणि राजापूर पोलीस ठाण्याचे निरीक्षक अमित यादव हे आपल्या सहकाऱ्यांसह घटनास्थळी पोहोचले. या आकस्मिक मृत्यूच्या मागे काहीतरी अनुचित प्रकार असावा, असा संशय बळावल्याने पोलिसांनी तातडीने फॉरेन्सिक टीम, एलसीबीचे पथक आणि श्वान पथकाला पाचारण केले आहे. श्वान पथकाच्या माध्यमातून घटनास्थळाच्या परिसरातील बारकावे तपासले जात असून, फॉरेन्सिक टीम मृत्यूचे नेमके कारण आणि अन्य पुराव्यांचा शोध घेत आहे. पोलीस या प्रकरणाचा सर्व बाजूंनी तपास करत असून, नेमका काय प्रकार घडला, याचा उलगडा लवकरच होण्याची शक्यता आहे. याप्रकरणी उलटसुलट चर्चा सुरू आहेत.

RELATED ARTICLES

Most Popular