28.5 C
Ratnagiri
Tuesday, July 8, 2025

जिल्हाधिकारी कार्यालयात गुरांसह बसण्याचा इशारा…

वाटद एमआयडीसीमध्ये कोणते प्रकल्प येणार याबाबत एमआयडीसीची...

पंढरीच्या विठूरायाला अज्ञात भाविकांकडून सोन्याचा पोषाख भेट…

श्री विठ्ठल रूक्मिणी मातेच्या चरणी नाव न...

वणवा मुक्तीसाठी राज्यात जनजागृती मोहीम – मंत्री उदय सामंत

वणवा लागल्यावर नुकसान भरपाई देण्याचा प्रश्न न...
HomeChiplunमुंबई-गोवा महामार्गाचे काम निकृष्टच आपला दावा खरा ठरलाः वैभव खेडेकर

मुंबई-गोवा महामार्गाचे काम निकृष्टच आपला दावा खरा ठरलाः वैभव खेडेकर

महामार्गावरील मोठा पूल समजल्या जाणाऱ्या जगबुडी नदीवरील पुलाला तडे गेले आहेत.

मुंबई- गोवा राष्ट्रीय महामार्गाचे काम निकृष्ट होत असल्याचे ४ वर्षापूर्वीपासूनच येथील मनसे नेते वैभव खेडेकर सांगत होते. मात्र राजकारणी, प्रशासन आणि पोलिसांनी आपला आवाज दाबून आपल्यावर गुन्हे दाखल करून आंदोलन चिरडून टाकले आणि आपल्याला दीड महिन्याची जेल भोगायला लावली. आता या महामार्गावरील मोठा पूल समजल्या जाणाऱ्या जगबुडी नदीवरील पुलाला तडे गेले आहेत. त्यामुळे हे काम निकृष्टच असल्याचे स्पष्ट झाले आहे असे सांगत वैभव खेडेकर यांनी आपले भाकित खरे ठरले असल्याचा दावा केला आहे. महामार्गावरील जगबुडी नदीवरील पुलाला तडे गेल्याचे दिसून आल्याने हे महामार्गाचे काम निकृष्ट होत असल्याचा आरोप खेडेकर यांनी केला होता.

पोलीस आणि प्रशासनाचे आधिकारी आले त्यांनी पाहणी करताना पुलाचे एक्स्पांशन जॉईंट तुटल्यामुळे ही परिस्थिती निर्माण झात्याचे लक्षात आल्यानंतर पुलाच्या उजव्या बाजूला तडे गेल्याने सध्या डाव्या बाजूने वाहतुक सुरळीत केली आहे. दरम्यान राष्ट्रीय महामार्गाचे अधिकारी या पूलाची पाहणी करणार असल्याचे सांगण्यात आले आहे. याबाबत पत्रकारांशी बोलताना वैभव खेडेकर म्हणाले की, आपण हे महामार्गाचे काम निकृष्ट असल्याचे चार वर्षापासून घसा कोरडा करून सांगत होतो. मात्र, आपला आवाज दाबुण मलाच सजा देण्यात आली. आता पुलाला तडे गेल्याने कामाचा दर्जा स्पष्ट झाला आहे.

हे पुलाबाबतच नव्हे तर राष्ट्रीय महामार्गाचा विचार करत बहादुरशेख नाका येथील पूल कोसळला, परशुरान घाटात भूस्खलन झाले. चिपळुणातील डि.बी.जे. कॉलेजची भिंत कोसळली. भोस्ते घाटात वारंवार अपघात होत आहेत. हे सर्व पाहता मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाचे मोठ्या प्रमाणात निकृष्ट काम होत असल्याचे स्पष्ट होत आहे, तरीही येथील लोकप्रतिनिधी व प्रशासन गप्पच आहेत. निदान आताच्या घटनेवरून तरी लोकप्रतिनिधी व प्रशासन यांचे डोळे सताड उघडे झाले असतील असे म्हणावयास हरकत नाही असे वैभव खेडेकर यांनी सांगितले.

मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या दुरावस्थेबाबत राज ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींशी चर्चा करून हा महामार्ग उत्तम व्हावा अशी विनंती केली होती. नितीन गडकरी यांनी तर महामार्गाचे काम निकृष्ट झाले तर ठेकेदाराला रोलरखाली घालेन असे सांगितले होते. मात्र महामार्गाची दुरवस्था आहे तशीच आहे. त्यामुळे येत्या दोन दिवसात मनसे संस्थापक अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेऊन आम्ही व्यथा मांडणार आहोत आणि पुढील आंदोलनाची दिशा ठरविणार असल्याचे वैभव खेडेकर यांनी सांगितले.

RELATED ARTICLES

Most Popular