25.7 C
Ratnagiri
Monday, December 23, 2024

मोदींनी जनतेचा खिसा कापला, पॉपकॉर्नपासून जुन्या कारपर्यंत जीएसटी वाढला

आधीच महागाईत होरपळणाऱ्या जनतेला दिलासा देण्याऐवजी मोदी...

रत्नागिरी जिल्हा रुग्णालयाला ८५ ‘एमबीबीएस’ डॉक्टर

जिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या रिक्त पदाचा आणि...

रत्नदुर्ग किल्ल्याच्या संरक्षणासाठी पुढाकार, गडकिल्ले संवर्धन

रत्नदुर्ग किल्ल्याच्या संरक्षणासाठी जिल्हाधिकाऱ्यांकडे गडकिल्ले संवर्धन प्रतिष्ठानच्या...
HomeChiplunमुंबई-गोवा महामार्गावरील कामे अर्धवटच, रास्ता रोकोचा इशारा

मुंबई-गोवा महामार्गावरील कामे अर्धवटच, रास्ता रोकोचा इशारा

२१ ऑगस्टला सावर्डेतील पोलिस ठाण्यासमोर रास्ता रोकोचा इशारा सावंत यांनी दिला आहे.

राष्ट्रीय महामार्गावरील सावर्डे, कोंडमळा, कामथे येथील प्रलंबित कामांबाबत सातत्याने पाठपुरावा करूनही त्याकडे दुर्लक्ष केले जात आहे. त्यामुळे शिवसेना ठाकरे गटाचे तालुकाप्रमुख संदीप सावंत यांनी ग्रामस्थांसह राष्ट्रीय महामार्ग कार्यालयावर धडक दिली. सावर्डेतील पोलिस ठाणे, तलाठी कार्यालयाची कामे मार्गी लागलेली नाहीत. प्रलंबित कामे त्वरित मार्गी लावावीत अन्यथा २१ ऑगस्टला सावर्डेतील पोलिस ठाण्यासमोर रास्ता रोकोचा इशारा सावंत यांनी दिला आहे. राष्ट्रीय महामार्ग विभागाचे शाखा अभियंता श्याम खुणेकर यांच्याशी चर्चा करताना माजी तालुकाप्रमुख संदीप सावंत म्हणाले, मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील नागरिकांना भेडसावणाऱ्या समस्यांबाबत आपण सातत्याने पाठपुरावा करत आहोत.

अनेकदा आंदोलने आणि उपोषणे केली. यातून आमच्यावर गुन्हेही दाखल झालेत; परंतु अधिकारी आणि ठेकेदार कंपनीच्या निष्काळजीपणामुळे नागरिकांना विविध समस्यांना सामोरे जावे लागते. कोंडमळा निवाचीवाडी येथे रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पावसाचे पाणी साचते. तेथे भुयारी मार्ग काढून पाण्याचा निचरा करावा, सर्व्हिस रोड करण्यात यावा. वहाळ फाट्यावरील उड्डाणपुलास तडे गेल्याने एकेरी मार्गावरून वाहतूक सुरू आहे. येथे निकृष्ट काम झाल्याने वाहनचालकांच्या जीवितास धोका आहे. त्यामुळे ठेकेदार ईगल कंपनीच्या सर्व अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करावेत.

कोंडमळा येथे नागरिकांसाठी रोड क्रॉसिंगचा पर्याय देण्यात यावा, वहाळफाटा येथील तुटलेल्या उड्डाणपुलाची चौकशी करून कारवाई करावी, वहाळफाटा येथील सर्व्हिस रोडची दुर्दशा झाल्याने तेथे डांबरीकरण करण्यात यावे. सावर्डे येथे मुख्य रस्ता ते सर्व्हिस रोड जोडणारे पोर्च तत्काळ दुरुस्त करावेत. कामथे येथून महामार्गावरून टेरव वेतकोंड येथे जाण्यास असलेल्या रोडरस्त्याची दुर्दशा झाली आहे. तेथे मोरी टाकून जोडरस्त्याचे डांबरीकरण करण्यात यावे. डीबीजे महाविद्यालयासमोरील अनधिकृत संरक्षण भिंत तोडण्याचे आदेश द्यावेत.

मागण्या मान्य न झाल्यास २१ ऑगस्टला सावर्डे पोलिस ठाण्यासमोर रास्ता रोकोचा इशारा दिला. अभियंता खुणेकर यांनी कामे मार्गी लावण्याचे आश्वासन दिले. या वेळी संभाजी पालशेतकर, सिद्धार्थ मोहिते, चंद्रकांत राडे, सतीश सावंत, अंकुश घेवडे, मंगेश चिचंकर, सोनू दुर्गवले, बारक्या शिगवण, हर्षल दुर्गोली, राजेंद्र म्हालीम, अनंत कराडकर, परशुराम फागे, सोमा म्हालीम, सुरेश म्हालीम आदी उपस्थित होते.

RELATED ARTICLES

Most Popular