26.4 C
Ratnagiri
Friday, October 18, 2024

अखिल शेओरानचे लक्ष्य कांस्यपदक, दुसरे पदक भारताच्या झोळीत

ISSF विश्वचषक फायनल भारताची राजधानी नवी दिल्ली...

महिला मतदार ठरवणार दापोलीचा आमदार दापोली मतदारसंघ

विधानसभा निवडणूक जाहीर झाली असून, सर्वांनी आचारसंहितेचे...
HomeIndiaचक्रीवादळ 'यास' मुळे ३ लाख घरांचे नुकसान

चक्रीवादळ ‘यास’ मुळे ३ लाख घरांचे नुकसान

बंगालच्या खाडीमध्ये आलेले चक्रीवादळ यास आता कुठे शांत होत आहे. गेल्या दोन दिवसांमध्ये बंगाल आणि ओडिशामध्ये या चक्रीवादळाच्या कारणाने बरेच नुकसान झालेले आहे बुधवारला जेव्हा या चक्रीवादळाचा लँडफॉल झाला तेव्हा बंगाल आणि ओडिशामध्ये बरेच नुकसान झाल्याचे दिसून आले. तुफानी पाऊस आणि वाऱ्यामुळे बऱ्याच ठिकाणी मोडतोड पाहावयास मिळाली. आता हे चक्रीवादळ भले शांत झाले असेल तरीपण या चक्रीवादळाचा परिणाम अजूनही जाणवतो आहे गुरुवारी आणि शुक्रवारी झारखंड बिहार पर्यंत वादळी पाऊस जाणवू शकतो जो या चक्रीवादळाचाचं परिणाम आहे.

ओडिसा मध्ये यास चक्रीवादळ धडकले होते

चक्रीवादळ यास यान सगळ्यात पहिल्यांदा ओडिशाच्या बालासोर शहरामध्ये आगमन केले होते. बुधवारी येथे जोरदार पाऊस पडला आणि समुद्राला देखील भली मोठी भरती आली होती ओडिशाच्या ओझर भागात झाड पडून एका व्यक्तीचा मृत्यू देखील झाला. चक्रीवादळाच्या कारणाने ठीक ठिकाणी झाडे पडली होती आणि बऱ्याच घरांची देखील मोडतोड होऊन त्यांचे नुकसान झाले होते. बालासोर मध्ये लँडफॉल झाल्यानंतर चक्रीवादळाने त्याच्या विनाशानंतरचे निशाण सोडलेले दिसून येत आहे. इथे गावांमध्ये समुद्राचे पाणी घुसले होते त्यामुळे लोकांना खूप त्रास होत होता प्रशासनातर्फे सर्व नागरिकांचे बचावकार्य हे चालू होते.

cyclone vyas

ओडिशा सरकारने चक्रीवादळामुळे प्रभावित झालेल्या १२८ गावांना मदत कार्य देणे सुरू केले आहे. ज्या मोठ्या रस्त्यांचे नुकसान झाले आहे आणि ज्या ठिकाणी लाईटचे खांब पडलेले आहेत त्या ठिकाणी मदत कार्य हे लगेच सुरू झाले आहे. या गावांमध्ये सध्यातरी पुढचे काही दिवस लाईट नसण्याने चिंता आहे.

बंगाल मध्ये देखील झाले नुकसान

पश्चिम बंगालच्या पूर्वेकडील मिदनापूर येथे चक्रीवादळ यास, याच कारणामुळे एका व्यक्तीचा मृत्यू झालेला आहे या वादळात बुधवारी तो गंभीररित्या जखमी झाला होता आणि त्यात तो वाचू शकला नाही बंगालमध्ये आत्तापर्यंत या चक्रीवादळामुळे तीन लोकांचा मृत्यू झालेला दिसून आला. बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी सांगितल आहे, जवळपास राज्यांमध्ये एक करोड पेक्षा जास्त लोक या चक्रीवादळाच्या तडाख्यात मध्ये आले होते आणि जवळपास तीन लाख घरांचं या चक्रीवादळामुळे नुकसान झाले आहे. त्यातले अजूनही पंधरा लाख लोक शासनाने उभ्या केलेल्या आपत्कालीन सेंटरमध्ये थांबलेले आहेत.

cyclone yaas

आज या  चक्रीवादळाची तीव्रता जरी कमी झाले असली तरी  बंगाल आणि ओडिशामध्ये याचा धोका अजूनही कायम आहे. झारखंड, बिहार, युपी त्या काही भागांमध्ये आजही तुफानी पाऊस आणि वारा घोंगावत आहे त्यामुळे शासनाने त्या ठिकाणी याची पूर्वसूचना देऊन लोकांना सतर्क केले आहे.

RELATED ARTICLES

Most Popular