26.4 C
Ratnagiri
Monday, June 23, 2025

रत्नागिरी नगरपरिषदेत सत्ता मिळविण्यासाठी राजकीय डावपेच…

रत्नागिरी नगर परिषद निवडणूकीचे मतलई वारे आता...

विद्यार्थ्याच्या मृत्यूप्रकरणी डॉक्टरच्या चौकशीचे आदेश…

खेड तालुक्यातील तळे कासारवाडी येथे नुकत्याच दहावी...

चिपळूण-कऱ्हाड मार्ग अवजड वाहनांसाठी बंदच…

कोयना ते पाटणदरम्यानच्या पुलाचे बांधकाम सुरू असताना...
HomeRatnagiriजिल्ह्यात तीन दिवस यलो अलर्ट...

जिल्ह्यात तीन दिवस यलो अलर्ट…

ताशी ४० ते ५० किमी प्रतितास वेगाने वारे वाहतील असा अंदाज आहे.

जिल्ह्यात वळवाच्या पावसाचा जोर १८ मेपर्यंत राहील, असा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. त्यामुळे सुरक्षिततेसाठी जिल्हा प्रशासनाने या कालावधीत यलो अलर्ट जारी केला आहे. जिल्ह्यात हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस आणि वीजाही चमकण्याची शक्यता आहे. ताशी ४० ते ५० किमी प्रतितास वेगाने वारे वाहतील, असा हवामान विभागाचा अंदाज आहे. गेले दोन दिवस जिल्ह्याच्या दक्षिण भागात मुसळधार पाऊस पडत आहे. लांजा तालुक्यात वीज पडून एकाचा मृत्यू झाला असून एक जण गंभीर जखमी झाला आहे. समुद्रकिनारी भागात गुरुवारी (ता. १५) सायंकाळी हलके वारे वाहत होते. दुपारी हवेत उष्मा जाणवत होता. सायंकाळी पावसाचे वातावरण तयार झाले. हवामान विभागाकडूनही १८ मे पर्यंत पाऊस पडेल अशी शक्यता वर्तविली आहे. त्यानुसार जिल्हा प्रशासनाने सतर्क राहण्याची सूचना केली आहे. ढगांच्या गडगडाटासह विजाही चमकण्याची शक्यता असल्यामुळे नागरिकांनी जीवित व मालमत्तेची ‘काळजी घ्यावी, असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी यांनी केले आहे.

जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाकडूनही सतर्कतेबाबत नागरिकांना सूचना दिल्या आहेत. विजा चमकत असताना संगणक, टीव्ही इत्यादी विद्युत उपकरणे बंद ठेवून स्रोतांपासून अलग करून ठेवावीत. दूरध्वनी, भ्रमणध्वनीचा वापर टाळावा. वीज चमकत असताना नागरिकांनी घराबाहेर पडू नये. घराबाहेर असल्यास सुरक्षित ठिकाणी आश्रय घ्यावा. विजेच्या खांबांपासून लांब राहावे. वीज चमकत असताना उंच झाडाखाली आश्रयास थांबू नये. वीज चमकत असताना एखाद्या मोकळ्या परिसरात असल्यास, गुडघ्यामध्ये डोके घालून वाकून बसावे. धातूच्या वस्तू दूर ठेवाव्यात. पाऊस पडत असताना किंवा वीज चमकत असल्यास नागरिकांनी झाडाखाली उभे राहू नये. मोबाईलवर संभाषण करू नये आणि इलेक्ट्रिक वस्तूंपासून दूर राहावे असे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.

दामिनी अॅपवर माहिती – वीज पडण्याची पूर्वसूचना मिळण्यासाठी मोबाईलवर ‘दामिनी अॅप’ डाउनलोड करून घ्यावे, असे आवाहन प्रशासनाने केले आहे. त्याद्वारे पुढील तीन तासांत कुठे वीज पडणार आहे, याची माहिती दिली जाते. बहुतांशवेळी हा अंदाज बरोबर ठरलेला आहे.

RELATED ARTICLES

Most Popular