27.3 C
Ratnagiri
Saturday, August 30, 2025

शिंदेंच्या मंत्र्यांवर लक्ष ठेवण्यासाठी अधिकारी…

राज्यात महायुती असली तरीही भाजपकडून कुरघोडींचे राजकारण...

पेढांबेतील पूल दुरुस्तीच्या प्रतीक्षेत, अवजड वाहतूक बंद

दुरुस्तीअभावी धोकादायक झालेला पेढांबे येथील जुन्या पुलावरून...

जनआरोग्य योजनेतील कार्ड बनवा : एम. देवेंदर सिंह

एकत्रित आयुष्मान भारत प्रधानमंत्री जनआरोग्य योजना, महात्मा...
HomeRatnagiriसोशल मिडियावर देशविरोधी स्टेटस् रत्नागिरीत तरुणाला यथेच्छ चोपले

सोशल मिडियावर देशविरोधी स्टेटस् रत्नागिरीत तरुणाला यथेच्छ चोपले

समाजात द्वेष निर्माण होईल यासाठी आता सोशल मिडियाचा आधार घेतला आहे.

सोशल मिडियावर भारत विरोधी स्टेटस ठेवल्याप्रकरणी एका तरूणाला संतप्त जमावाने यथेच्छ तुडवल्याची घटना रत्नागिरीनजिक जांभूळ फाटा परिसरात घडली. या घटनेत जखमी झालेल्या तरूणाला जिल्हा रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. याची माहिती मिळताच जिल्हा रूग्णालयात मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. भारताने पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा बदला घेतल्यानंतर देशभरात भारतीय सैनिकांचे तोंडभरून कौतुक होत आहे. अशाचवेळी काही सम ाजकंटकांनी समाजात द्वेष निर्माण होईल यासाठी आता सोशल मिडियाचा आधार ‘घेतला आहे. अशाच समाजकंटकांना आता भर रस्त्यात तुडवण्याचा कार्यक्रम सुरू झाला आहे. हा तरूण कामानिमित्त रत्नागिरीत राहत असून त्याने भारताविरूद्ध व धर्माविरूद्ध सोशल मिडियावर स्टेटस ठेवल्याचा आरोप आहे. त्याचे स्टेटस त्याच्या काही मित्रांनी पाहिले आणि त्याचे स्क्रिन शॉट सर्वत्र व्हायरल झाले.

गुरूवारी दुपारी २ वाजण्याच्या सुमारास तो महादेवनगर, जांभूळफाटा परिसरात उभा होता. यावेळी तरूणांचा एक घोळका त्याच्याजवळ येऊन पोहोचला. या घोळक्याने त्याला स्टेटसबाबत विचारणा केली. सुरूवातीला उडवाउडवीची उत्तरे देणाऱ्या तरुणाला त्या घोळक्यातील तरूणांनी चांगलाच प्रसाद दिला अशी चर्चा सुरु आहे. या मारहाणीत जखमी झालेल्या या तरुणाला तात्काळ जिल्हा रूग्णालयात दाखल केले. त्याच्यावर सध्या जिल्हा रूग्णालयात उपचार सुरू आहेत. या घटनेची माहिती मिळताच दंगा काबू पथक जिल्हा रूग्णालयात दाखल झाले होते. याप्रकरणी शहर पोलीस स्थानकात परस्पर विरोधी गुन्हे दाखल करण्याची कार्यवाही सायंकाळी उशीरापर्यंत सुरू होती. मात्र रात्रौ उशीरापर्यंत कोणत्याही प्रकारचा गुन्हा दाखल झाला नव्हता. परस्पर विरोधी तक्रारी दाखल होण्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे.

RELATED ARTICLES

Most Popular