26.1 C
Ratnagiri
Monday, September 1, 2025

कोत्रेवाडीतील कचरा प्रकल्पाला विरोध कायम, उपोषणकर्त्यांकडे प्रशासनाचे दुर्लक्ष

कोत्रेवाडी येथील प्रस्तावित डंपिंग ग्राऊंड हटावसाठी ग्रामस्थांनी...

आरवली-संगमेश्वर ते बावनदी येथील खड्डे जैसे थे

राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनी आरवली-संगमेश्वर ते बावनदी...

मुंबई-गोवा महामार्गासाठी ना. योगेश कदम यांचे गणपतीबाप्पाला साकडे

पुढच्या वर्षी महामार्ग पूर्ण होईल असे दरवर्षी...
HomeKhedजिल्हा परिषदेच्या शिक्षकाला ४० हजारची लाच घेताना रंगेहात पकडले

जिल्हा परिषदेच्या शिक्षकाला ४० हजारची लाच घेताना रंगेहात पकडले

रायगड जिल्ह्यातील पनवेल येथे हा प्रकार उघडकीला आला आहे.

चार शिक्षकांचे प्रलंबित पगार काढण्यासाठी ४० हजार रुपयांची लाच घेताना जिल्हा परिषद शिक्षकाला रंगेहात पकडण्यात आले. रायगड जिल्ह्यातील पनवेल येथे हा प्रकार उघडकीला आला आहे. अमित राजेश पंडया, (वय ४७ वर्षे, उप शिक्षक, प्रथामिक शाळा जाताडे, ता. पनवेल) असे या शिक्षकाचे नाव आहे. त्याला खालापुर येथे ताब्यात घेतले असून याबाबत खालापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, रायगड जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागात तक्रारदार हे शिक्षक म्हणुन कार्यरत असुन, तक्रारदार व त्यांच्या सोबतचे इतर तीन शिक्षक यांचे माहे जुन /२०२४ व जुलै/२०२४ या कालावधीचे वेतन अदा करणेबाबतचे आदेश रायगड जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षणाधिकारी यांच्या कार्यालयाकडुन निघणेकरीता लोकसेवक अमित राजेश पंडया यांनी ४०,०००/- रूपयेची मागणी करीत असलेबाबत तक्रार प्राप्त झाली होती.

तक्रारदार यांनी लाच लुचपत प्रतिबंधक विभाग रायगड यांच्या कार्यालयाकडे केलेल्या अनुषंगाने पडताळणीच्या वेळी दि. ४ सप्टेंबर रोजी १९.१० ते १९.५७ वाजण्याचे दरम्यान तक्रारदार यांचेकडे पनवेल बस स्थानक येथे ४०,०००/- रूपये लाचेची मागणी करून लाचेची रक्कम तात्काळ स्विकारण्याचे मान्य केले. दि. ४ सप्टेंबर रोजी २०.४६ वाजता लोकसेवक अमित पंडया यांचेविरूध्द सापळा आयोजित केला असता, लोकसेवक यांना संशय आल्याने त्यांनी लाचेची रक्कम स्विकारली नाही. त्यानंतर दिनांक १८ सप्टेंबर रोजी १७.४५ वाजता जुन्या मुंबई-पुणे हायवेवर खालापुर फाटा, ता. खालापुर येथे सापळा लावला असता, अमित पंडया यांना तक्रारदार यांचेकडून ४०,०००/- रूपये लाचेची रक्कम स्विकारताना पंचासमक्ष रंगेहाथ पकडण्यात आले.

RELATED ARTICLES

Most Popular