24.4 C
Ratnagiri
Friday, September 20, 2024

Redmi Note 14 मालिका 50MP OIS कॅमेऱ्यासह लॉन्च केला जाईल…

कंपनीने अधिकृतपणे Redmi Note 14 सीरीजचा खुलासा...

आता कसोटी क्रिकेटचे नगारे, डिसेंबरपर्यंत दहा सामने

सातत्यपूर्ण व्हाइटबॉल क्रिकेट खेळल्यानंतर उद्यापासून भारताच्या कसोटी...

नेटवर्कअभावी लाडक्या बहिणी त्रस्त, ग्रामीण भागातील स्थिती

पुरवठा विभागाने घरगुती गॅस सिलिंडरसाठी मोबाईलवरील येणारा...
HomeRatnagiriकोयना धरणात १३.५३६ दशलक्ष युनिट जादा वीज

कोयना धरणात १३.५३६ दशलक्ष युनिट जादा वीज

नव्याने सुरू झालेल्या या तांत्रिक जलवर्षात पहिल्या ४५ दिवसांत कोयना जलविद्युत प्रकल्पात पश्चिमेकडे ५.७८ टीएमसी पाण्यावर २५५.७०७ दशलक्ष युनिट वीजनिर्मिती झाली.

कोयना धरण तांत्रिक जलवर्षाच्या पहिल्या ४५ दिवसांत प्रचंड पाणीटंचाई व आपत्कालीन परिस्थितीवर मात करत तसेच अनेक दिवस तब्बल १००० मेगावॅट क्षमतेचा कोयना चौथा जलविद्युत निर्मिती टप्पा बंद असताना देखील आतापर्यंत गतवर्षीच्या तुलनेत १३.५३६ दशलक्ष युनिट जादा वीजनिर्मिती झाली आहे. पश्चिम वीजनिर्मिती ५.७८ तर पूर्वेकडे सिंचनासाठी सोडण्यात आलेल्या २.७७ अशा एकूण ८.५५ टीएमसी पाण्यावर २६३. १८८ दशलक्ष युनिट वीजनिर्मिती झाली आहे. नव्याने सुरू झालेल्या या तांत्रिक जलवर्षात पहिल्या ४५ दिवसांत कोयना जलविद्युत प्रकल्पात पश्चिमेकडे ५.७८ टीएमसी पाण्यावर २५५.७०७ दशलक्ष युनिट वीजनिर्मिती झाली.

गतवर्षी ५.२७ टीएमसीवर २३६.८०८ दशलक्ष युनिट वीजनिर्मिती झाली होती. या वेळी तुलनात्मक पश्चिमेकडे ०.५१ टीएमसी पाणीवापर जास्त झाल्याने १८.८९९ दशलक्ष युनिट वीजनिर्मिती जास्त झाली आहे. पूर्वेकडे सिंचनासाठी सोडलेल्या पाण्यावर कोयना धरण पायथा वीजगृहातून वीजनिर्मिती करून ते पाणी कोयना नदीपात्रात सोडण्यात येते. सिंचनासाठी सोडलेल्या २.७७ टीएमसी पाण्यावर ७.४८१ दशलक्ष युनिट वीजनिर्मिती झाली. गतवर्षी सिंचनासाठी सोडलेल्या ४.२६ टीएमसी पाण्यावर १२.८५२ दशलक्ष युनिट वीजनिर्मिती झाली होती. तुलनात्मक यावर्षी १.४९ टीएमसी पाणीवापर कमी झाल्याने ५.३७१ दशलक्ष युनिट कमी वीजनिर्मिती झाली आहे.

चारही जलविद्युत प्रकल्पांचा विचार करता आतापर्यंत एकूण ८.५५ टीएमसी पाण्यावर २६३.१८८ दशलक्ष युनिट वीजनिर्मिती झाली. त्याचवेळी गतवर्षी ९.५३ टीएमसी पाण्यावर २४९.६५२ दशलक्ष युनिट वीजनिर्मिती झाली होती. गतवर्षीच्या तुलनेत यावर्षी एकूण ०.९८ टीएमसी पाणीवापर कमी झाला असला तरी पश्चिमेकडे जादा पाणीवापर झाल्याने यातून १३.५३६ दशलक्ष युनिट जादा वीजनिर्मिती झाली आहे. पश्चिम वीजनिर्मितीसाठी वर्षभरात ६७.५० टीएमसी पाणी लवादाचा आरक्षित कोटा आहे.

RELATED ARTICLES

Most Popular