25.2 C
Ratnagiri
Thursday, October 10, 2024

राजापुरात तीन गावांमध्ये वीज पडून नुकसान

ढगांच्या गडगडाटासह रत्नागिरी, राजापूर तालुक्यात परतीच्या पावसाने...

कोकणातील १५ जागा महायुती जिंकेल – मंत्री उदय सामंत

आगामी विधानसभेसाठी रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिह्यातल्या किती...

सात औद्योगिक संस्थांना नवी ओळख…

कॅबिनेट मंत्री मंगल प्रभात लोढा यांच्या पुढाकारामुळे...
HomeMaharashtraभाजपच्या तब्बल २५ जागा 'डेंजर झोन' मध्ये?….

भाजपच्या तब्बल २५ जागा ‘डेंजर झोन’ मध्ये?….

लोकसभा निवडणुकीत '४००' पार' चा अति आत्मविश्वास अंगलट आला आहे.

महाराष्ट्रात लोकसभे पाठोपाठ विधानसभेतही भाजपला मोठा फटका बसणार की काय अशी भीती आता भाजपच्या गोटातच व्यक्त केली जाऊ लागली आहे. मागील विधानसभा निवडणुकीत भाजपला १०५ जागा मिळाल्या परंतु आता त्यापैकी सुमारे २५ जागा ‘डेंजर झोन’मध्ये असल्याची भीती व्यक्त केली जात आहे. मागील दोन्ही विधानसभा निवडणुकांमध्ये भाजपचा आलेख हा घसरगुंडीचा असल्याने ही भीती अधिक ‘गडद’ बनली आहे.

आलेख घसरगुंडीचा ! – भाजपला २०१४ च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत १२२ जागा मिळाल्या व भाजप हा विधानसभेतील सर्वात मोठा पक्ष ठरला. परंतु २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत भाजपला १७ जागा गमवाव्या लागल्या व १०५ वर समाधान मानावे लागले. आता २०१४ च्या निवडणुकीत परिस्थिती ‘गंभीर’ बनली आहे.

लोकसभेला फटका – काही महिन्यांपूर्वी झालेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपला देशभरात व महाराष्ट्रातही मोठा फटका सहन करावा लागला. त्याचीच पुनरावृत्ती आता २ महिन्यांवर येऊन ठेपलेल्या विधानसभा निवडणुकीत होते की काय अशी भीती आता खुलेआम व्यक्त होऊ लागली आहे.

२५ जागा डेंजर झोन मध्ये – या निवडणुकीत भाजपच्या १०५ पैकी तब्बल २५ जागा ‘डेंजर झोन’ मध्ये असल्याचे सांगण्यात येते. म हाराष्ट्रात ‘मराठा फॅक्टर’ ने भाजपला लोकसभेत जंबर फटका बसल्याने आता भाजपसाठी ही धोक्याची घंटा मानली जात आहे. विशेष म्हणजे या २५ जागांमध्ये दिग्गज नेत्यांच्या मतदार संघांचाही समावेश आहे.

भाजपची कसरत – त्यामुळे ‘डेंजर झोन’ मधील या २५ जागा वाचविण्यासाठी भाजपला प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागेल. लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात भाजपने सपाटून मार खाल्ल्यानंतर आता भाजपच्या मदतीला राष्ट्रीय स्वयंसेवक संघ धावून आला आहे. त्यामुळे विशेष प्लॅनिंग व खलबते जोमाने सुरु आहेत.

२५ जागा धोक्यात ? – भाजप नेत्यांच्या बैठकीत आपण ८५ जागा जिंकू शकतो असा दावा करण्यात आला होता. त्यामध्ये काही नवीन मतदार संघांचाही समावेश आहे. पण आता २५ जागा धोक्यात असल्याची माहिती समोर आल्याने महाराष्ट्रातील भाजप नेतृत्वाची चिंता चांगलीच वाढली आहे.

भाजपची सावध पावले – महाराष्ट्रातील सुमारे ५० जागांवर निश्चित विजय मिळेल असा भाजपच्या गोटातून विश्वास व्यक्त केला जात आहे. त्याखेरीज आणखी ७५ जागा जिंकण्याचे ‘टार्गेट’ केंद्रीय गृहमंत्री ना. अमित शहा यांनी भाजपसमोर ठेवले आहे. लोकसभा निवडणुकीत ‘४००’ पार’ चा अति आत्मविश्वास अंगलट आल्याने आता भाजप विधानसभा निवडणुकीसाठी सावध पावले टाकत आहे.

RELATED ARTICLES

Most Popular