25.2 C
Ratnagiri
Thursday, October 10, 2024

राजापुरात तीन गावांमध्ये वीज पडून नुकसान

ढगांच्या गडगडाटासह रत्नागिरी, राजापूर तालुक्यात परतीच्या पावसाने...

कोकणातील १५ जागा महायुती जिंकेल – मंत्री उदय सामंत

आगामी विधानसभेसाठी रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिह्यातल्या किती...

सात औद्योगिक संस्थांना नवी ओळख…

कॅबिनेट मंत्री मंगल प्रभात लोढा यांच्या पुढाकारामुळे...
HomeRatnagiriनेटवर्कअभावी लाडक्या बहिणी त्रस्त, ग्रामीण भागातील स्थिती

नेटवर्कअभावी लाडक्या बहिणी त्रस्त, ग्रामीण भागातील स्थिती

पुरवठा विभागाच्या अटींमुळे गॅस वितरक नियमांवर बोट ठेवत आहेत.

पुरवठा विभागाने घरगुती गॅस सिलिंडरसाठी मोबाईलवरील येणारा ओटीपी देण्याची अट लागू केल्याने ग्रामीण भागातील गृहिणींची चांगलीच धावपळ उडाली आहे. ग्रामीण भागात अनेक ठिकाणी मोबाईलला रेंज मिळत नसल्यामुळे घरगुती सिलिंडर नोंदणीसाठी रेंज शोधत फिरावे लागते. त्यात सिलिंडरची नोंद झाली तर आता प्रशासनाने संबंधित ग्राहकाला देते वेळी मोबाईलवरील येणाऱ्या ओटीपीची अट घातल्यामुळे तो दाखविल्या शिवाय सिलिंडर मिळत नाही. परिणामी, शासनाच्या लाडक्या बहिणींना मात्र नवीन समस्यांना सामोरे जावे लागत आहे. एकीकडे वृक्षतोडीला बंदी असल्यामुळे चूल पेटवून स्वयंपाक बनवावा म्हटले तर त्यासाठी सर्पण नाही.

दुसरीकडे ओटीपी नसल्याने गॅस मिळत नाही. त्यामुळे ग्रामीण भागातील महिला चांगल्याच अडचणीत आल्या आहेत. पुरवठा विभागाच्या अटींमुळे गॅस वितरक नियमांवर बोट ठेवत आहेत. त्यात सर्वसामान्यांचे हाल होत असून, दुसरीकडे गॅस वितरक मात्र सर्व नियम पायदळी तुडवत आहेत. नोंदणी केलेला गॅस सिलिंडर ग्राहकांना देताना तो वजन करूनच द्यायचा आहे; मात्र कोणत्याही वितरकाच्या गाडीत वजनकाटा नसतो. ग्राहकाने सिलिंडर वजन करून मागितल्यास आमच्याकडे वजनकाटा नाही, सिलिंडर घ्यायचा असेल तर घ्या, अशी उत्तरे मिळतात. अशा प्रकारात ग्राहकांची फसवणूक होण्याची शक्यताच अधिक आहे. याकडे त्या त्या तालुक्यातील पुरवठा विभागाने दुर्लक्ष करू नये, अशी मागणी केली जात आहे.

RELATED ARTICLES

Most Popular