22.7 C
Ratnagiri
Thursday, February 6, 2025

ना. नितेश राणे आता भाजपचे रत्नागिरी जिल्हा संपर्कमंत्री

राज्याचे मत्स्य व्यवसाय व बंदरे विकास मंत्री...

पुन्हा केवायसीचा कार्डधारकांमागे ससेमिरा, शिधापत्रिकाधारकांतून नाराजी

रेशनकार्ड आधार ई-केवायसी करून घेण्याच्या सूचना शासनाकडून...

पालू लघुपाटबंधारे योजनेला मंजुरी, किरण सामंत यांचा पुढाकार

उन्हाळ्यामध्ये टंचाईग्रस्त भागात पहिला टँकर सुरू कराव्या...
HomeRatnagiriगोगटे जोगळेकर महाविद्यालयाचा आणि कविकुलगुरु केंद्र यांच्यात सामंजस्य करार

गोगटे जोगळेकर महाविद्यालयाचा आणि कविकुलगुरु केंद्र यांच्यात सामंजस्य करार

संस्कृत प्रचार, प्रसारासाठी संयुक्त उपक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे

रामटेक येथील कविकुलगुरु कालिदास विश्व विद्यालयाचे भारतरत्न डॉ. पां. वा. काणे अध्ययन केंद्र आणि गोगटे-जोगळेकर महाविद्यालयाचा संस्कृत विभाग यांनी सामंजस्य करार केला आहे. रत्नागिरीत संस्कृत विषयातील अनेक विद्वान, शास्त्री होऊन गेले. हे गतवैभव पुन्हा एकदा निर्माण करण्याकरिता याअंतर्गत कुलगुरु आणि प्राचार्य व उपप्राचार्य आदींच्या भेटीचा छोटेखानी कार्यक्रम गोगटे महाविद्यालयात झाला. विश्वविद्यालय व महाविद्यालयाची कोणतीही स्पर्धा नाही तर संस्कृत वाढीसाठी एकमेकांना पूरक काम करण्याचे ठरवण्यात आले.

या सामंजस्य कराराअंतर्गत एकमेकांना पूरक अभ्यासक्रम सुरू करण्यात येणार आहेत. संस्कृत प्रचार, प्रसारासाठी संयुक्त उपक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे याशिवाय संस्कृत विषयक कार्यशाळा व शिबीरांचे संयुक्त आयोजन केले जाईल. शैक्षणिक सहली व प्रवास यांचेही आयोजन केले जाणार आहे. महाविद्यालयात जे अभ्यासक्रम नाहीत ते केंद्रामध्ये चालू करण्यात येतील.

संस्कृत भाषा आणि साहित्य, भारतीय तत्वज्ञान,  प्राचीन भारतीय विज्ञान,  भारतीय ज्ञान परंपरा आणि सामाजिक उपक्रम या सर्व क्षेत्रात विश्वविद्यालय आणि गोगटे महाविद्यालय एकत्रित काम करणार आहेत. तसेच रत्नागिरीच्या संस्कृत परंपरेविषयी आणि संस्कृतच्या जास्तीत जास्त वाढीसाठी नवनवीन प्रकल्प हाती घेऊन संशोधन व माहिती संकलन, विविध चर्चासत्रांचे आयोजन करण्याचे ठरवण्यात आले.

कोकणातील सर्वांत जुन्या रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीचे गोगटे महाविद्यालय असून संस्कृतची मोठी परंपरा येथे जपली जात असल्याचे महाविद्यालयाच्या संस्कृत विभाग प्रमुख डॉ. कल्पना आठल्ये यांनी सांगितले. या वेळी कुलगुरु डॉ. मधुसूदन पेन्ना यांनी महाविद्यालयाने उपकेंद्र सुरू झाल्यापासून मदतीचा हात दिला आहे, यापुढेही चांगले उपक्रम राबवू, संस्कृतकरिता योगदान देऊ अशी ग्वाही दिली. जास्तीत जास्त शाळांमध्ये संस्कृत सुरू करणे आणि महाविद्यालयीन शिक्षणात संस्कृतकरिता विद्यार्थ्यांची संख्या वाढण्याकरिता माध्यमिक, उच्च माध्यमिक स्तरावर काम करण्याची सूचना प्राचार्य डॉ. पी. पी. कुलकर्णी यांनी दिली.

RELATED ARTICLES

Most Popular