गावागावातील जिल्हा परिषद शाळा, अंगणवाड्यांसह कुपोषित बालके, आरोग्य केंद्रांमध्ये लागणाऱ्या सुविधा किंवा साहित्य लोकसहभागामधून देणगी स्वरूपात मिळवण्यासाठी सुरू केले होते. मुख्य कार्यकारी अधिकारी कीर्तीकिरण पुजार यांनी स्वतः एका शाळेला साहित्य भेट देऊन त्याची सुरवात केली. प्रशासनाच्या आवाहनाला चांगला प्रतिसाद मिळाला असून गेल्या आठ महिन्यांमध्ये ३ कोटी ४२ लाख रुपयांचे साहित्य देणगीमधून मिळवण्यात यश आले.
दैनंदिन गोष्टींसाठी शासनाकडून तत्काळ निधी उपलब्ध होतोच असे नाही. त्यामुळे शाळा, अंगणवाडी, आरोग्य केंद्रांमध्ये तुटवडा किंवा गैरसोय होते. शासनाकडे पाठपुरावा करण्यापेक्षा स्थानिक पातळीवर त्या गोष्टी उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करण्याचा निर्णय जिल्हा परिषद प्रशासनाने केला आहे. मिशन आपुलकीद्वारे देणगी देणाऱ्या लोकांना पुढे येण्याचे आवाहन करण्यात आले होते. त्यामधून शाळांना लागणारे साहित्य किंवा सुविधा देणगीदाराने उपलब्ध करून द्यावयाच्या आहेत.
एकात्मिक बाल विकास प्रकल्पांतर्गत ७०४ संस्थांसाठी १ हजार ३२२ देणगीदारांनी ३२ लाख ८ हजार ५०७ रुपये, आरोग्य विभाग २९ जणांनी ६ लाख ४६ हजार रुपये, पंचायत समिती ३५ जणांनी ११ लाख १९ हजार ९००, पशुसंवर्धन विभाग ३० जणांनी २८ हजार ३०० रुपये तर शिक्षण विभागाकडील १४४३ शाळांना २ हजार ९९२ जणांनी २ कोटी ९२ लाख ७७ हजार १९४ रुपयांच्या वस्तू दिल्या आहेत. २ हजार १९७ संस्थांना ४ हजार ४०७ जणांनी ३ कोटी ४२ लाख ८० हजार ८२६ रुपये दिले आहेत. यामधून शाळांना कपाटे, संगणक, ई-क्लासरूम, मुलांना शालेय साहित्य, फॅन यासारख्या वस्तू उपलब्ध करून दिल्या आहेत.