26.5 C
Ratnagiri
Wednesday, November 13, 2024

हरचिरी-उमरेत पकडली ७६ वानर-माकडे , आंबा बागायतदारांना दिलासा

गेल्या महिन्यात सुमारे ७० वानर माकडे पकडण्यात...

चिपळूणचे मटण, मच्छीमार्केट १८ वर्षे बंद

चिपळूण शहरातील मटण आणि मच्छीविक्रीचा प्रश्न गंभीर...

कोयना धरणातून यंदा उन्हाळ्यात पुरेशी वीजनिर्मिती

कोयना धरणातून यावर्षी पावसाळ्यात १८ टीएमसी पाणी...
HomeSindhudurgकोकण रेल्वे मार्गावरील धावत्या रेल्वेतून पडल्याने ३ मुली पडल्या

कोकण रेल्वे मार्गावरील धावत्या रेल्वेतून पडल्याने ३ मुली पडल्या

सावंतवाडी रेल्वे स्टेशन येथे उतरत असताना ही दुर्घटना घडली.

सावंतवाडी रेल्वे स्टेशन येथे चालू रेल्वमधून पडल्याने तीन शाळकरी मुली जखमी झाल्या. यातील दोन मुलींच्या डोक्याला तर एका मुलीच्या तोंडाला मार लागला आहे. त्यांना उपचारासाठी तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. या मुली रेल्वेने कणकवलीहून प्रशिक्षणासाठी मळगावला निघाल्या होत्या. ही घटना सकाळी ९ वाजता घडली. सावंतवाडी रेल्वे स्टेशन येथे तीन मुली रेल्वेतून पडल्याची खबर येथील स्टॉलधारक रेडीज यांनी सामाजिक बांधिलकीच्या रवी जाधव तत्काळ दिली असता सामाजिक बांधिलकीचे रवी जाधव व रूपा मुद्राळे यांनी जखमी मुलींना रुग्णालयात दाखल केले. डॉ. चौगुले यांनी त्यांच्यावर प्राथमिक उपचार करून त्यातील दोन मुलींच्या डोक्याचं सिटीस्कॅन करुन अधिक उपचारासाठी गोवा बांबोळी येथे पाठवण्यात आले. त्यातील दोन मुलींची प्रकृती स्थिर आहे तर दुसरी मुलगी अजूनही बेशुद्ध अवस्थेत आहे.

सदर मुली मळगाव हायस्कूल येथे सुरू असलेल्या प्रशिक्षणासाठी कणकवली वरून सावंतवाडी रेल्वे स्टेशन येथे उतरत असताना ही दुर्घटना घडली. या घटनेची त्यांच्या प्रशिक्षकांना माहिती मिळतातच त्यांचे प्रशिक्षक प्रताप परब, वसंत तावडे यांनी घटनास्थळी धाव घेतली. सदर मुलीचे प्रशिक्षक व शिक्षकांनी सामाजिक बांधिलकीच्या कार्याचे कौतुक करून रवी जाधव व रूपा मुद्राळे यांचे आभार मानले.

RELATED ARTICLES

Most Popular