26.6 C
Ratnagiri
Tuesday, January 27, 2026

जिल्ह्यात गुप्त बैठकांचा जोरात धडाका उमेदवारांची पडताळणी, रणनीतीला वेग

जिल्ह्यात उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया पूर्ण होताच...

अपघाती जखमींना ‘कॅशलेस’ उपचार, मदतीसाठी धावणाऱ्यांनाही २५ हजार !

रस्ते अपघातानंतर जखमींच्या जीवितासाठी अत्यंत निर्णायक ठरणाऱ्या...

अर्ज भरले; आता माघार घेण्यासाठी नेत्यांची मोर्चे बांधणी

आगामी जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर...
HomeMaharashtraप्रभादेवीत शिवसेना आणि शिंदे गटात झालेल्या राड्याला वेगळे वळण

प्रभादेवीत शिवसेना आणि शिंदे गटात झालेल्या राड्याला वेगळे वळण

शिवसेनेने केलेल्या दाव्यानुसार सरवणकर यांच्या गोळीबारात शिवसेनेचे विभागप्रमुख महेश सावंत आणि एक पोलीस अधिकारी बालंबाल बचावले आहेत.

मुंबईतील प्रभादेवीत शिवसेना आणि शिंदे गटात रात्री राडा झाला. यावेळी आमदार सदा सरवणकर यांनी गोळीबार केल्याचा त्यांच्यावर आरोप केला जात आहे. प्रभादेवीत सदा सरवणकर यांनी दोन वेळेस गोळीबार केला असल्याचा आरोप त्यांच्यावर होत आहे. शिवसेनेने केलेल्या दाव्यानुसार सरवणकर यांच्या गोळीबारात शिवसेनेचे विभागप्रमुख महेश सावंत आणि एक पोलीस अधिकारी बालंबाल बचावले आहेत. परंतु,  सरवणकर यांनी पत्रकार परिषद घेऊन त्यांच्यावरील आरोप फेटाळून लावले आहेत.

माझ्याकडे बंदुकीचा परवाना आहे. परंतु, मी गोळीबार केलेला नाही. एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेलो म्हणून मला बदनाम करण्याचा प्रयत्न केला जातोय, आसा आरोप सरवणकर यांनी शिवसेनेवर केला आहे. दादर पोलिसांनी शिंदे गटाचे आमदार सदा सरवणकर यांचं पिस्तुल जप्त करण्यात आलं आहे. विसर्जनाच्या दुसऱ्या दिवशी झालेल्या राड्यावेळी सदा सरवणकर यांनी गोळीबार केल्याचा आरोप शिवसेनेकडून करण्यात आला होता. तसेच, याप्रकरणी चौकशी करण्याची मागणीही करण्यात आली होती. दरम्यान, याप्रकरणी पोलिसांनी रविवारी गुन्हा दाखल केला आहे. तसेच, घटनास्थळावरुन पोलिसांकडून गोळीही जप्त करण्यात आली होती.

गणेश विसर्जनच्या दिवशी प्रभादेवी परिसरात शिवसेनेकडून गणेश भक्तांचे स्वागत करण्यासाठी मंच उभारण्यात आला होता. मात्र, या मंचाच्या शेजारी शिंदे गटाने देखील आपला मंच उभारलेला. या मंचावरून शिंदे गटाच्या लोकांनी शिवसेनेच्या नेत्यांबद्दल अपशब्द वापरले. त्यामुळे दोन्ही गटात शाब्दिक बाचाबाची झाली. या वादाचे रुपांतर मध्यरात्री राड्यात झाले. शिंदे गटात असलेले माजी नगरसेवक समाधान सरवणकर आणि वरळीतील शिवसेनेच्या माजी नगरसेविका हेमांगी वरळीकर यांच्यात वाद झाले होते. दोन्ही गटात शाब्दिक बाचाबाची झाली. त्यानंतर शनिवारी शिवसेना उपनेत्या किशोरी पेडणेकर यांनी दादर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार नोंदवली होती.

RELATED ARTICLES

Most Popular