28.7 C
Ratnagiri
Sunday, November 23, 2025

रेशन दुकानदारांची दिवाळी ‘कडू’, पालकमंत्र्यांना निवेदन देणार

जिल्ह्यातील रेशन दुकानदारांचे जुलै महिन्यापासून थकलेले कमिशन...

४४ कोटींच्या डांबर खरेदीत अनियमितता – बाळ माने

रत्नागिरी पालिकेत २०१४ ते २३ या कालावधीत...

खेर्डी-टेरव मार्ग होणार खड्डेमुक्त, बांधकाम विभागाचे आश्वासन

पुढील पंधरा दिवसांत खेर्डी-टेरव रस्त्यावरील सर्व खड्डे...
HomeRatnagiriपर्यटन दिनाचे औचित्य साधून रत्नागिरीमध्ये पर्यटन महोत्सवाचे आयोजन

पर्यटन दिनाचे औचित्य साधून रत्नागिरीमध्ये पर्यटन महोत्सवाचे आयोजन

त्नागिरी पर्यटन सहकारी सेवा संस्था आणि जिल्हा प्रशासन, पर्यटन संचालनालय (डीओटी, कोकण विभाग, नवी मुंबई) यांच्यातर्फे पर्यटन महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.

रत्नागिरी जिल्ह्याला निसर्गाची भरभरून देणगी असल्याने, अनेक प्रकारची विविधता आढळते. त्यामध्ये  वेगवेगळ्या प्रकारचे स्वच्छ समुद्रकिनारे,  श्रीक्षेत्र गणपतीपुळेसारखे जागतिक दर्जाचे धार्मिक पर्यटनस्थळ तसेच ऐतिहासिक किल्ले,  सह्याद्रीचे खोरे,  पावसाळ्यातील आकर्षक कोकण, ऐतिहासिक दर्जाची स्थळे अशी पर्यटकांना भुरळ घालणारी अनेक पर्यटनस्थळे जिल्ह्यात आहेत. त्यामुळे या नैसर्गिक देणगीची येथील स्थानिक नागरिकांच्या मनामध्ये पर्यटनविषयी जनजागृती निर्माण होण्यासाठी रत्नागिरी पर्यटन सहकारी सेवा संस्था आणि जिल्हा प्रशासन, पर्यटन संचालनालय (डीओटी, कोकण विभाग, नवी मुंबई) यांच्यातर्फे पर्यटन महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.

२७ सप्टेंबरला जागतिक पर्यटनदिनाचे औचित्य साधून येथील अल्पबचत सभागृहात महोत्सव होईल. ”पर्यटनाचा पुनर्विचार या संकल्पनेवर हा दिन साजरा करणार असल्याचे पर्यटनसंस्थेचे संस्थापक अध्यक्ष राजू भाटलेकर यांनी केले आहे. सदरच्या कार्यक्रमास उद्योगमंत्री उदय सामंत, जिल्हाधिकारी डॉ. बी. एन. पाटील, इन्फिगो आयकेअरचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. श्रीधर ठाकूर, माजी खासदार नीलेश राणे, भाजप जिल्हाध्यक्ष अॅड. दीपक पटवर्धन, माजी नगराध्यक्ष राहुल पंडित, पर्यटन संचालनालय कोकण विभागचे हणमंत हेडे, माजी आमदार बाळासाहेब माने व हिरवळ प्रतिष्ठानचे किशोर धारिया यांच्यासमवेत अनेक संस्थांचे पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत.

देश-विदेशातून आता फार मोठ्या प्रमाणात पर्यटक रत्नागिरी जिल्ह्यामध्ये येत असतात. त्याचप्रमाणे येथे सोयीसुविधा निर्माण होण्यासाठी स्थानिक नागरिकांमध्ये जनजागृती व स्थानिक कलांना वाव देण्यासाठी महोत्सवाचे आयोजन केल्याचे भाटलेकर म्हणाले.

तसेच या कामाची विशेषता म्हणजे या वेळी पर्यटन क्षेत्रात नावीन्यपूर्ण काम केलेल्या व्यक्तींचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात येणार आहे. पर्यटकप्रेमी व नवीन तरुण व्यावसायिक, टुरिस्ट गाईड व जास्तीत जास्त नागरिकांनी या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन भाटलेकर यांनी केले आहे.

RELATED ARTICLES

Most Popular