26.5 C
Ratnagiri
Monday, February 9, 2026

दहावी – बारावी परीक्षेपूर्वी बोर्डाचं ‘डिजिटल शस्त्र’

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उत्व माध्यमिक शिक्षण...

रत्नागिरीत ‘जनसुरक्षा’ कवच भक्कम जीवनज्योती विमा

सामान्य नागरिकांना आर्थिक प्रवाहात आणण्यासाठी केंद्र सरकारने...
HomeEntertainmentफोटो शेअर करत “या” अभिनेत्रीने म्हटले मी होकार दिला आहे

फोटो शेअर करत “या” अभिनेत्रीने म्हटले मी होकार दिला आहे

लग्नाच्या अफवांमध्ये मलायकाने तिच्या आगामी शोची माहिती सोशल मीडियावर दिली आहे.

मलायका अरोरा आणि अर्जुन कपूर दीर्घकाळापासून एकमेकांसोबत रिलेशनशिपमध्ये आहेत. चाहत्यांमध्ये दोघांच्या लग्नाच्या बातम्या अनेकदा येत असतात. अलीकडेच मलायकाने सोशल मीडियावर स्वत:चा एक फोटो शेअर केला होता, ज्यानंतर या जोडप्याने एंगेजमेंट केल्याचा अंदाज फॅन्स लावत आहेत. मलायकाच्या या पोस्टवर चाहत्यांनी आणि जवळच्या मित्रांनी तिचे जोरदार अभिनंदन करण्यास सुरुवात केली. दरम्यान, लग्नाच्या बातमीवर मलायकाची प्रतिक्रियाही समोर आली आहे. पोस्टमध्ये मलायकाने सांगितले की तिने तिच्या नवीन रिअॅलिटी शोसाठी होकार दिला आहे.

लग्नाच्या अफवांमध्ये मलायकाने तिच्या आगामी शोची माहिती सोशल मीडियावर दिली आहे. पोस्ट शेअर करताना मलायका म्हणाली- ‘होय मी डिस्ने प्लस हॉट स्टारवर येत असलेल्या मुव्हिंग मलायका या रिअॅलिटी शोला हो म्हटलं आहे. जिथे तुम्हाला माझ्याबद्दल अधिक जाणून घेण्याची संधी मिळेल. आप को क्या लगा, मी माझ्या रिअॅलिटी शो बद्दल बोलत होते, जो ५ डिसेंबरला प्रदर्शित होणार आहे.

वास्तविक मलायका अरोराने सोशल मीडियावर एक लाजाळू फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये अभिनेत्री आधी ब्लॅक कलरचा ड्रेस परिधान करताना दिसत आहे. फोटो शेअर करताना मलायकाने लिहिले  ‘मी होकार दिला आहे.  मलायकाचे हे कॅप्शन वाचून लोकांनी असे मानले की तिने अर्जुनला लग्नासाठी होकार दिला आहे. मलायकाला सोशल मीडियावर शुभेच्छांचा वर्षाव होऊ लागला.

अर्जुन आणि मलायका अनेक वर्षांपासून रिलेशनशिपमध्ये आहेत. २०१९ मध्ये मलायकाने सोशल मीडियावर एका पोस्टद्वारे नात्याची अधिकृत घोषणा केली होती. जेव्हा या जोडप्याने हे जाहीर केले तेव्हा त्यांना वयाच्या अंतरामुळे सोशल मीडियावर ट्रोलिंगचा सामना करावा लागला. मात्र, या जोडीला मीडिया आणि चाहत्यांचे भरभरून प्रेम मिळाले.

RELATED ARTICLES

Most Popular