25.8 C
Ratnagiri
Saturday, September 6, 2025

एसटी प्रशासनाकडून लोकेशन अॅप’ची केवळ घोषणा

लालपरी'चे अचूक ठिकाण मोबाईलवर दिसेल, बस वेळेवर...

पीकविमा योजनेत खेड-दापोली आघाडीवर…

प्रधानमंत्री पीकविमा योजना यंदा नव्या स्वरूपात रत्नागिरी...

परतीचा प्रवास ठरला कोंडीचा… वाहनांच्या रांगा

गौरी-गणपती विसर्जनानंतर चाकरमान्यांचा परतीचा प्रवास बुधवारपासून सुरू...
HomeRatnagiriभाट्ये येथे वाळूशिल्पातून स्वा. सावरकरांना अभिवादन - कलाकार अमित पेडणेकर

भाट्ये येथे वाळूशिल्पातून स्वा. सावरकरांना अभिवादन – कलाकार अमित पेडणेकर

भाट्ये येथे स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकर, दानशूर भागोजीशेठ कीर यांचे देखणे वाळूशिल्प येथील मूर्तीकार, कलाकार अमित पेडणेकर यांनी साकारले आहे. हे शिल्प पाहण्याकरिता भाट्ये समुद्रकिनाऱ्यावर शेकडो लोकांनी गर्दी केली. भाट्ये गावच्या सरपंच प्रीती भाटकर यांनी फीत कापून आणि सागरी सीमा मंचाचे प्रांत सहसंयोजक संतोष सुर्वे यांनी श्रीफळ वाढवून या वाळूशिल्पाचे उद्घाटन केले. महाराष्ट्र शासन पर्यटन संचालनालय, विवेक व्यासपीठ, पतितपावन मंदिर संस्था आणि श्री भागोजीशेठ कीर ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने २१ मे पासून सावरकर विचार जागरण सप्ताह सुरू आहे. महाराष्ट्रात रत्नागिरी, भगूर, नाशिक, मुंबई, पुणे व सांगली येथे या सप्ताहानिमित्त सावरकरांचा विचार पोहोचवण्यासाठी विविध कार्यक्रमांचे आयोजन केले आहे.

रत्नागिरीत वाळूशिल्पाचे उद्घाटन आज सायंकाळी करण्यात आले. या वाळूशिल्पामध्ये वीर सावरकर, दानशूर भागोजीशेठ कीर, पतितपावन मंदिर, मोरया बोट साकारण्यात आले आहे. हे वाळूशिल्प अतिशय सुरेख साकारल्याबद्दल अनेकांनी मूर्तीकार अमित पेडणेकर यांचे कौतुक व अभिनंदन केले. तसेच अनेकांनी आपल्या मोबाईल कॅमेऱ्यामध्ये या वाळूशिल्पाची छबी टिपून घेतली. उद्घाटनप्रसंगी पतितपावन मंदिर संस्थेचे अॅड. बाबासाहेब परूळेकर, श्री भागोजीशेठ कीर ट्रस्टचे ट्रस्टी अॅड. विनय आंबुलकर, अॅड. शाल्मली आंबुलकर आदी उपस्थित होते. साईजित शिवलकर यांनी सूत्रसंचालन केले. तनया शिवलकर यांनी मान्यवरांचे स्वागत केले.

२८ ला शोभायात्रा, सहभोजन, मन की बात – सावरकर विचार जागरण सप्ताहाचे संयोजक रवींद्र भोवड यांनी २१ मेपासून सुरू असलेल्या दुचाकी फेरी, रांगोळी प्रदर्शन, वक्तृत्व स्पर्धा, कीर्तन याविषयी माहिती दिली. २८ मे रोजी मोठ्या दिमाखात शोभायात्रा काढण्यात येणार आहे. कारागृह ते पतितपावन मंदिरापर्यंत होणाऱ्या या शोभायात्रेत हजारो सावरकरप्रेमी नागरिक सहभागी होणार आहे. तसेच ८ चित्ररथही आहेत. त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा मन की बात हा कार्यक्रम मंदिरातून थेट प्रक्षेपित केले जाणार आहे. स्वा. सावरकरांची जयंतीला प्रथमच पतितपावन मंदिराची निवड करण्यात आली आहे. या वेळी राज्याचे पर्यटन मंत्री मंगलप्रभात लोढा हेसुद्धा या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती रवींद्र भोवड यांनी दिली.

RELATED ARTICLES

Most Popular