28.9 C
Ratnagiri
Monday, December 9, 2024

Huawei च्या Mate 70 मालिकेला प्रचंड मागणी, 67 लाखांहून अधिक युनिट्सचे बुकिंग

चीनी स्मार्टफोन निर्माता Huawei ने गेल्या महिन्यात...

शाहीद कपूरसोबत नॅशनल क्रश तृप्ती डिमरी झळकणार एका नव्या चित्रपटात

तृप्ती डिमरीचा यशस्वी प्रवास - तृप्ती डिमरीने...

IND vs AUS दुसऱ्या कसोटीत टीम इंडियाचा लाजिरवाणा पराभव

ॲडलेडमध्ये खेळल्या गेलेल्या पिंक बॉल कसोटी सामन्यात...
HomeRatnagiriछायाचित्रकारांकडून वायंगणी समुद्रकिनाऱ्याची स्वच्छता

छायाचित्रकारांकडून वायंगणी समुद्रकिनाऱ्याची स्वच्छता

शहराजवळील वायंगणी या अतिशय सुंदर समुद्रकिनाऱ्यावर प्लास्टिक बाटल्या कचरा साचल्याने अस्वच्छता पाहायला मिळाली. याची दखल रत्नागिरी जिल्हा फोटोग्राफर्सनी घेतली आणि दोन तास श्रमदान करून किनाऱ्याची स्वच्छता केली. सामाजिक बांधिलकी म्हणून छायाचित्रकारांनी स्वतःहून पुढाकार घेत हा उपक्रम राबविला. यात सुमारे ३५ पिशव्यांतून कचरा गोळा करण्यात आला. या उपक्रमाचे सर्वांकडून कौतुक होत आहे. रत्नागिरीतील छायाचित्रकार बऱ्याचदा प्रीवेडिंग फोटोग्राफीसाठी समुद्रकिनारी कचरा गोळा झालेला दिसतो. मानवी कृतीतून समुद्रात किंवा समुद्रकिनारी अस्वच्छता पसरवली जाते. त्यामुळे समुद्राचे पाणी हे दूषित होऊन त्याचा परिणाम हा जलचरांवर होत आहे.

समुद्रात किंवा समुद्र किनाऱ्यावर प्लास्टिक पिशव्या, बॉटल, खाद्यपदार्थांचे आवरण टाकून अस्वच्छता पसरवण्यात येते. त्यांची स्वच्छता करणे हे प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य आहे. हे लक्षात घेऊन वायंगणी समुद्रकिनाऱ्यावर ही स्वच्छता करण्यात आली. सकाळी सहा ते आठ या वेळेत स्वच्छता करण्यात आली. याकरिता ३० छायाचित्रकारांनी मेहनत घेतली. ३५ पिशव्यांतून सुमारे दोनशे ते अडीचशे किलो कचरा गोळा करण्यात आला. सर्व छायाचित्रकार समुद्रकिनाऱ्याचा वापर करत असल्याने आपले कर्तव्य म्हणून छायाचित्रकारांनी यात उत्स्फूर्तपणे भाग घेतला. या उपक्रमाकरिता ग्रामपंचायत सरपंच मिताली भाटकर, उपसरपंच जिगरमियाँ पावसकर, ग्रामविकास अधिकारी पद्मजा खटावकर आणि सर्व ग्रामस्थ, ग्रामपंचायतच्या सदस्यांचे सहकार्य लाभले.

RELATED ARTICLES

Most Popular